शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

राणे थंडावले, काँग्रेसमध्येच राहणार

By admin | Updated: August 5, 2014 18:33 IST

काँग्रेस नेतृत्वावर टीकेची तोफ डागून उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देणारे नारायण राणेंचे बंड कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय थंडावले आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ५ - काँग्रेस नेतृत्वावर टीकेची तोफ डागून उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देणारे नारायण राणेंचे बंड थंडावले आहे. काँग्रेस हायकमांडकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळूनही नारायण राणेंनी काँग्रेसमध्येच कायम राहणार असल्याचे जाहीर केले आहे. राणेंनी मंत्रीपदाचा कार्यभारही स्वीकारण्याची तयारी दर्शवली असून उद्यापासून राज्यात काँग्रेसच्या प्रचारासाठी उतरु अशी घोषणाही राणेंनी केली आहे. 
मंगळवारी संध्याकाळी नारायण राणेंनी त्यांच्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. 'काँग्रेसने अद्याप माझा राजीनामा स्वीकारला नाही. राहुल गांधी व अन्य ज्येष्ठ नेत्यांशी मी गेल्या काही दिवसांत भेट घेतली. गेल्या वेळी झालेल्या चूका भविष्यात घडणार नाही असे आश्वासन मला काँग्रेस हायकमांडने दिल्याने मी काँग्रेसमध्येच कायम राहणार आहे असे नारायण राणेंनी जाहीर केले. मात्र हायकमांडने नेमके काय आश्वासन दिले हे त्यांनी सांगणे त्यांनी टाळले. त्यामुळे राणेंची पुन्हा एकदा बोळवणच  झाली असून त्यांचा बंड फसल्याचे दिसते. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले पण ते पूर्ण केले नाही असा आरोप करणारे नारायण राणेंनी आज यूटर्न घेतले. 'मला पदाची लालसा नाही. मी गेली अनेक वर्ष विविध पदांवर कार्यरत आहे. पदच माझ्यामागे धावून येतात असे राणेंनी सांगितले.  
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने राज्यात नेतृत्व बदल करावे अन्यथा पक्षाचा पराभव अटळ आहे. या पराभवाचा वाटेकरी व्हायचे नाही असे सांगत नारायण राणेंनी दोन आठवड्यांपूर्वी उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. याविषयी विचारले असता नारायण राणे म्हणाले, मी काँग्रेसचा पराभव होईल असे म्हटले नव्हते. विधानसभेत काँग्रेसचा विजय व्हावा यासाठी मी प्रयत्न करीन. 
पत्रकार परिषदेपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कृपाशंकर सिंह या नेत्यांनी नारायण राणेंच्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राणेंच्या मनधरणीचे यशस्वी प्रयत्न केले. सुमारे तासभराच्या बैठकीनंतर माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत राणेंशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. राणे मोहन प्रकाश यांची भेट घेणार असून मोहन प्रकाश राणेंच्या मागण्यांवर दिल्लीत हायकमांडशी चर्चा करतील व हायकमांड त्यावर अंतिम निर्णय घेईल असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.