शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणमधील काँग्रेसच्या बैठकीत राणे समर्थकाचा गोंधळ, दंगल नियंत्रक पथक तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 02:16 IST

सिंधुदुर्गापाठोपाठ रत्नागिरी जिल्हा काँग्रेसने शनिवारी चिपळूण येथे बोलाविलेल्या बैठकीतही जोरदार गदारोळ झाला.

चिपळूण (जि.रत्नागिरी) : सिंधुदुर्गापाठोपाठ रत्नागिरी जिल्हा काँग्रेसने शनिवारी चिपळूण येथे बोलाविलेल्या बैठकीतही जोरदार गदारोळ झाला. बैठकस्थळी लावलेल्या बॅनरवर ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांचे छायाचित्र नसल्यामुळे आक्रमक झालेल्या राणे समर्थकांमुळे सभेच्या सुरूवातीपासून गोंधळ सुरू झाला आणि तो वाढतच गेला. अखेर दंगलविरोधी पथक तैनात करण्याची वेळ आली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर बैठक शांततेत पार पडली.चिपळूणमधील ब्राह्मण सहाय्यक संघामध्ये काँग्रसने बैठक बोलाविली होती. खासदार हुसेन दलवाई, जिल्हा प्रभारी विश्वनाथ पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर उपस्थित होते.छायाचित्र नसल्याचे कारण पुढे करीत राणे समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे सभेच्या सुरुवातीला गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर गोंधळी राणे समर्थक कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तर गदारोळ आणखी वाढली. सभागृहाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दंगल नियंत्रणपथकाला पाचारण करण्यातआले.राणे समर्थक कार्यकर्त्यांनी खासदार हुसेन दलवाई व विश्वनाथ पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांना राणे समर्थकांना शांत कसेबसे यशआले त्यानंतर मात्र बैठक शांततेत झाली.राणे यांना भाजप संधी देणार नाही:हुसेन दलवाईज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांनी काँग्रेसमध्येच राहावे. त्यांना भाजप संधी देईल, असे वाटत नाही. त्यामुळे पक्षात राहून पक्षाचे एकजुटीने काम करावे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे प्रतिपादन खासदार हुसेन दलवाई या बैठकीत केले.बैठकीचे निमंत्रणच नाही : सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये बैठका घेऊन काँग्रेसने अंतर्गत वादाला सुरुवात केली आहे. आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते असूनही, आम्हाला या सभेला बोलविण्यात आले नाही. तसेच सभागृहामध्ये लावलेल्या बॅनरवर नारायण राणे व नीलेश राणे यांचा उल्लेख व छायाचित्र नसल्यामुळे राणे समर्थक आक्रमक झाल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष परिमल भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे