शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राणे राजकीय भूकंपाच्या तयारीत

By admin | Updated: June 3, 2014 02:29 IST

काँग्रेसचे उद्योगमंत्री नारायण राणो येत्या दोन -तीन दिवसांत राजकीय भूकंप घडविण्याच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेसमधील अनेक मंत्री आणि आमदार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर टोकाचे अस्वस्थ झाले आहेत.

काँग्रेसमध्ये टोकाची अस्वस्थता : दोन-तीन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार
अतुल कुलकर्णी - मुंबई
काँग्रेसचे उद्योगमंत्री नारायण राणो येत्या दोन -तीन दिवसांत राजकीय भूकंप घडविण्याच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेसमधील अनेक मंत्री आणि आमदार  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर टोकाचे अस्वस्थ झाले आहेत. तशातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळ विस्तारावरून ज्या पद्धतीच्या नाचक्कीला सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे ते स्वत:ही त्रस्त दिसत आहेत.
सोमवारी प्रस्तुत प्रतिनिधीने राणो यांची भेट घेतली असता ‘आज नाही, दोन-तीन दिवसांत सविस्तर बोलतो,’ असे सांगून  मनातल्या अस्वस्थतेला त्यांनी वाट करून दिली. मंत्रिमंडळ विस्तारावरून पडद्याआड मोठे राजकारण घडले. हतबल आणि प्रचंड नाराज झालेल्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री उशिरार्पयत दिल्लीशी संपर्क चालू ठेवला होता. काही करा, कोणालाही मंत्री करा; पण अधिवेशन सुरू होण्याच्या आधी शपथविधी करू द्या़ आधीच सरकारची आणि आपली व्यक्तिगत खूपच बदनामी होत आह़े त्यात शपथविधी झालाच नाही तर ते वाईट दिसेल, असे पटवून देण्यात रात्री उशिरा त्यांना यश आले आणि अखेर सोमवारी सकाळी शपथविधी पार पडला. मात्र विधान परिषदेवर पाठविण्यात येणा:या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावांची यादी देखील अद्याप अंतिम करण्यात काँग्रेसला यश आलेले नाही. 
मुख्यमंत्री निर्णयच घेत नाहीत़ गेलो की शांतपणो ऐकून घेतात़ आपण यावर बैठक बोलावू म्हणतात आणि पुढे काहीच होत नाही, अशी जवळपास काँग्रेसच्या सर्वच मंत्री आणि आमदारांची भावना झाली आहे. त्यातच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की फेरबदल, याकडे अनेक जण लक्ष ठेवून होते. मात्र विस्तार झाला आणि मुख्यमंत्र्यांना अभय मिळाले, हे स्पष्ट झाल्यानंतर ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे -पाटील, नारायण राणो, पतंगराव कदम यांनी त्यांची नाराजी कुठे ना कुठे बोलून दाखवणो सुरू केले. काँग्रेसअंतर्गतच बंड करायचे आणि ताकद दाखवून द्यायची, अशा चर्चाही रंगू लागल्या. यापैकी राणो यांनीच आपली नाराजी स्पष्टपणो दाखवून दिली. 
नारायण राणो यांच्या गोटातून :
राणो यांच्या गोटातून मिळालेली माहिती वेगळीच आहे. त्यांच्या जवळच्या एका आमदाराने राणोंचीच कैफियत मांडली. तो म्हणाला, की गेली तीन-चार वर्षे राणो मित्रंच्या, पत्रकारांच्या सांगण्यावरून गप्प बसून होते. मात्र आता किती दिवस गप्प बसायचे. गप्प बसण्याचा त्यांचा स्वभाव नाही. उद्योगमंत्री या नात्याने त्यांनी केलेले औद्योगिक धोरण एक वर्षे मुख्यमंत्र्यांकडे तसेच पडून होते. पेपरमधून बातम्या आल्यानंतर ते वर्षभराने जशास तसे मंजूर करून पाठवले. जर काहीच दुरुस्त्या नव्हत्या तर कशाला एवढे दिवस लावले? एमआयडीसीमध्ये एसआरए योजना करण्याची फाइल देखील तशीच पडून ठेवली गेली. विजेच्या दरमाफीचा अहवाल तयार होऊनही तो नागपूर अधिवेशनात स्वीकारलाच नाही. त्यांच्या विभागाला मागितलेले अधिकारी देखील वेळेवर मिळत नसतील, तर मंत्री म्हणून राहण्यात काय अर्थ आहे, असा संतप्त सवालही त्या आमदाराने केला.
 
अस्वस्थ नारायण राणो कोणती भूमिका घेणार, याविषयी कमालीचे मौन आहे. मात्र काँग्रेसमधील आमदारांचा एक गट राणो यांनी नेतृत्व कराव़े आपण त्यांच्यासोबत जाऊ, अशी भूमिका घेत आहे. अशा स्थितीत खरेच फाटाफूट होणार की राणो नवीनच समीकरण मांडणार, याकडे काँग्रेससह राष्ट्रवादीचे नेतेही लक्ष ठेवून आहेत. सूत्रंच्या दाव्यानुसार भाजपात जाण्याचा मार्गही राणो यांच्यासाठी खुला आहे.