कणकवली : उद्योगमंत्री नारायण राणो गुरुवारपासून सिंधुदुर्गच्या दौ:यावर येत आहेत. त्यांच्या राज्यव्यापी दौ:याचा प्रारंभ ते सावंतवाडीतून करणार असून, विरोधकांचा ते कसा समाचार घेतात आणि नेमके कोणत्या मुद्दय़ावर बोलतात, याकडे आता सर्वाचेच लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत पंधरा दिवसांपूर्वी राणो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, मंगळवारी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पदाचा राजीनामा मागे घेतल्याचे सांगितले.
राणोंचा आजपासून राज्यव्यापी दौरा
By admin | Updated: August 7, 2014 01:29 IST