शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पुत्रांमुळे राणेंचा भाजपाप्रवेश रखडला, प्रवेश फॉर्म्युला ठरला नाही; दानवेंची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 05:58 IST

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना प्रवेश देण्यास भाजपा श्रेष्ठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असले तरी राणे यांच्या दोन्ही पुत्रांच्या राजकीय भवितव्याविषयी कोणतेही ठोस आश्वासन अद्याप दिले न गेल्याने राणेंचा भाजपा प्रवेश अडल्याचे म्हटले जाते.

विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना प्रवेश देण्यास भाजपा श्रेष्ठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असले तरी राणे यांच्या दोन्ही पुत्रांच्या राजकीय भवितव्याविषयी कोणतेही ठोस आश्वासन अद्याप दिले न गेल्याने राणेंचा भाजपा प्रवेश अडल्याचे म्हटले जाते.राणे यांचे पुत्र निलेश हे लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते तर दुसरे पुत्र नितेश हे विधानसभेवर निवडून गेले. स्वत: राणे यांचा पराभव झाला होता. राणे यांना राज्यसभेवर पाठविले जाईल आणि निलेश यांना विधान परिषदेवर पाठवून नितेश यांना राज्यमंत्री पद दिले जाईल,अशी अटकळ लावली जात आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी या संदर्भात कोणतीही चर्चा काल झाली नाही आणि तसा फॉर्म्यूलाही ठरलेला नाही, असे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी आज लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.सूत्रांनी असेही सांगितले की राणे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यास भाजपाने अनुकूलता दर्शविली आहे. शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलेले राणे यांनी अनेकदा काँग्रेसच्या नेत्यांवरच टीकास्त्र सोडले आहे. भाजपात तसे करता येत नसते अशी सूचक समज त्यांना देण्यात आली आहे. अशीही माहिती आहे की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापेक्षाही राणेंना भाजपात घेण्याविषयी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील जास्त उत्सुक आहेत. त्यामुळे राणे यांचा प्रवेश हा मुख्यमंत्र्यांच्या नव्हे तर पाटील यांच्या माध्यमातून होत असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी आज राणे यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणेंच्या निवासस्थानी गेले होते. राणे यांनी गेले काही दिवस काँग्रेसच्या मंचावर जाण्याचे टाळले आहे. सोलापुरातील काँग्रेसच्या मेळाव्याला रविवारी त्यांनी पाठ दाखविली होती.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपा