शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

होळीच्या नावाने रामूचा शिमगा

By admin | Updated: March 13, 2017 11:41 IST

राम गोपाल वर्मा आणि वाद हे जणू समीकरणच झालं आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 13 - राम गोपाल वर्मा आणि वाद हे जणू समीकरणच झालं आहे. वादग्रस्त ट्विट करण्यासाठी दिग्दर्शक राम गोपाल वर्मा प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महिला दिनी अभिनेत्री सनी लिओनीचा उल्लेख करत केलेल्या आक्षेपार्ह ट्विटचा वाद क्षमत नाही तोच आणखी एक ट्विट करून राम गोपाल वर्मानं लोकांची नाराजी ओढवून घेतली आहे. होळीच्या शुभेच्छा देताना त्याची संकुचित मनोवृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. राम गोपाल वर्मा म्हणाला, वर्षातला हा एकमेव असा सण आहे की जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांना ओल्या कपड्यात पाहण्याची मज्जा लुटू शकतात. तसेच एकमेकांना स्पर्श करू शकतात. कोणत्या देवानं कोणत्या राक्षसाचा वध केला हे मला माहीत नाही, मात्र असे बोल्ड क्षण ज्या राक्षसांमुळे निर्माण झाले आहेत त्यांचे मी आभार मानतो, असंही रामू म्हणाला आहे.120 कोटी जनतेपैकी एकाला तरी होळी सण का साजरा करतात याचं कारण माहीत असेल का, याची मला शंका आहे. मात्र त्यांना भांग पिण्यासाठी कोणतंही कारण लागत नाही, असंही त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे धुळवडीच्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर रंगांची चिखलफेक होऊन टीकेचेच रंग पुन्हा उधळले जाण्याची शक्यता आहे.(सनी लिओनीचा आदर्श ठेवा, महिला दिनी रामूचा अजब सल्ला)

तत्पूर्वी, सतत वादग्रस्त टिप्पणी करत चर्चेत राहणारा दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याने  'महिला दिना'निमित्त वादग्रस्त ट्विटची परंपरा कायम ठेवली होती. 'हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनीचा आदर्श समोर ठेवा आणि पुरुषांना आनंद द्या' असा अजब सल्ला रामूने महिलांना दिला होता. एवढेच नव्हे तर ' महिला दिनाला पुरुष दिन म्हणावे कारण महिलांपेक्षा पुरुषच हा दिवस जास्त साजरा करतात,' असेही त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.