शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसोबत अरेरावी करणा-या रामटेकच्या भाजपा आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 21:39 IST

निवेदन देण्यास गेलेल्या महिलांना असभ्य वागणूक देत अरेरावी करणे तसेच जीवघेणा प्रयत्न करणे रामटेकच्या भाजपा आमदार द्वारम मल्लिकार्जुन रेड्डी यांना महागात पडले. त्यांच्याविरोधात महिलांनी रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आमदाराविरुद्ध भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

रामटेक, दि. 8 - निवेदन देण्यास गेलेल्या महिलांना असभ्य वागणूक देत अरेरावी करणे तसेच जीवघेणा प्रयत्न करणे रामटेकच्या भाजपा आमदार द्वारम मल्लिकार्जुन रेड्डी यांना महागात पडले. त्यांच्याविरोधात महिलांनी रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आमदाराविरुद्ध भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.याबाबत रामटेक पोलीस ठाण्यात संगीता वांढरे, रा. कांद्री यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आशा लोखंडे, लता सोनेकर, उषा कामडे, ललिता दोंदलकर, सयनाला शेख, अम्माजी जाधव यांच्यासह २० ते २५ महिला आ. डी. एम. रेड्डी यांच्या मनसर येथील कार्यालयात शुक्रवारी सकाळी गेल्या होत्या. मायक्रोफायनान्स कंपनी महिलांना त्रास देत आहे, याकडे तुम्ही लक्ष घाला, कारवाई करा या मागणीचे निवेदन घेऊन आपबिती सांगितली. दरम्यान निवेदन देण्याच्या तयारीत महिला असताना निवेदन घेण्यास नकार दिला. महिलांना असभ्य वागणूक देत संगीता वांढरे यांच्या अंगावर वाहन आणण्याचा प्रयत्न केला. त्यात संगीता यांच्या पायाला लागले, असे वांढरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, आमदारांनी रामटेक पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. तेथे उपस्थित महिलांना पोलिसांनी गाडीत बसवून पोलीस ठाण्यात आणले. लोकप्रतिनिधी आमचे ऐकत नाही, असभ्य वागणूक दिली, जीव घेण्याचा प्रयत्न केला असेही तक्रारी नमूद केले.रामटेक पोलिसांनी सुरुवातीला चालढकल करीत महिलांची तक्रार घेण्याचे टाळले. मात्र प्रहार संघटनेचे रमेश कारामोरे, विनय चौधरी यांनी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देताच महिलांची तक्रार घेण्यात आली. त्या तक्रारीवरून आमदार रेड्डींविरुद्ध भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला. आहे.........महिलांनीच शिवीगाळ केलीमी गाडीने बाहेर निघण्याच्या तयारीत असताना २५-३० महिला आल्या. त्यांनी मायक्रोफायनान्सचा विषय सांगताच हा विषय शासनाकडे असल्याचे मी सांगितले. मात्र त्या महिलांनी तुम्ही तीन महिन्यांपासून काहीच करीत नाही, असे म्हणत मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्वीय सचिव आणि सुरक्षा रक्षकांनी महिलांना समजावले. त्या महिला काहीही ऐकून घेण्याच्या तयारीत नसल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस तेथे आले आणि महिलांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. या प्रकरणात काही एक तथ्य नाही.- डी. एम. रेड्डी,आमदार, रामटेक.