काशीळ (कऱ्हाड) : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पाल (ता. कऱ्हाड) येथील श्री खंडोबा देवाची गेली २५ वर्षे अविरत सेवा करणाऱ्या ‘रामप्रसाद’ हत्तीला उपचारांसाठी सोमवारी पहाटे उत्तर प्रदेशमधील मथुरेला रवाना करण्यात आले. त्यामुळे खंडोबा यात्रेत यंदाची मिरवणूक ‘रामप्रसाद’विना होण्याची शक्यता आहे.वाढत्या वयाबरोबर रामप्रसादला शारीरिक थकवा जाणवू लागला होता. त्यामुळे खंडोबा देवस्थानने त्याला वन विभागाकडे सुपुर्द करण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा वनविभाग आणि मथुरा येथील ‘एलिफंट कंझर्व्हेशन केअर सेंटर’ यांनी रामप्रसादला ताब्यात घेतले आणि सोमवारी खास ‘अॅनिमल अॅम्ब्युलन्स’मधून रामप्रसादचा मथुरेच्या दिशेने प्रवास सुरू झाला. (प्रतिनिधी)जंगलात नव्हे, रेस्क्यू सेंटरमध्येउपचारांनंतर रामप्रसादला जंगलात सोडणार असल्याची चर्चा असली, तरी मथुरेतील ‘रेस्क्यू सेंटर’मध्येच तो राहणार आहे.खंडोबा यात्रेदरम्यान निघणाऱ्या मिरवणुकीच्या वेळी हत्तीवर मानकरी बसलेले असतात. भाविक हत्तीवर खोबरं व भंडारा उधळत असतात. यामुळे गेल्या वर्षी रामप्रसाद उधळला होता आणि त्यात एक महिला ठार झाली होती.
कऱ्हाड येथील ‘रामप्रसाद’ उपचारासाठी मथुरेला रवाना!
By admin | Updated: December 22, 2015 02:32 IST