मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ)चे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आज (शनिवार) एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी दहा वाजता मुंबई विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जाणार आहेत. त्यानंतर मरिन ड्राईव्ह येथील गरवारे क्लबमध्ये आयोजित मेळाव्यात रामनाथ कोविंद महाराष्ट्रातील रालोआचे खासदार आणि आमदारांना संबोधित करतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजवर्गीय यांचीही यावेळी उपस्थिती असणार असल्याचे भाजपाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
रामनाथ कोविंद आज मुंबईत
By admin | Updated: July 15, 2017 04:34 IST