शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'रामदास कदम हे खोटारडे, स्वार्थासाठी केली गद्दारी'; क्लीप प्रकरणात आता सूर्यकांत दळवींची उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 23:08 IST

Suryakant Dalvi : क्लीपशी माझा काहीही सबंध नाही, या कदम यांच्या खुलाशावर दळवी यांनी भाष्य केले आहे.

दापोली :  माजी मंत्री रामदास कदम हे खोटारडे असून, स्वार्थासाठी त्यांनी पक्षाशी अनेक वेळा गद्दारी केली आहे.  माझ्या बाबतीत सुद्धा त्यांनी असेच केले होते, असा खळबळजनक आरोप दापोलीतील शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केला आहे. व्हायरल ऑडियो क्लिप प्रकरणात आता दळवी यांनीही उडी घेतली आहे. 

क्लीपशी माझा काहीही सबंध नाही, या कदम यांच्या खुलाशावर दळवी यांनी भाष्य केले आहे. कदम यांच्या यांच्या वक्तव्यानंतर स्थानिक पातळीवर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे.  रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी कदम यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

दरम्यान, भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी गेल्या काही महिन्यांत शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सातत्याने आरोप करून सोमय्यांनी त्यांना वारंवार अडचणीत आले आहे. परब यांच्यावर तुटून पडलेल्या सोमय्यांना शिवसेनेच्याच बड्या नेत्याचा रस पुरवल्याचा आरोप आता राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. याशिवाय, मनसेच्या नेत्याने सोमय्या आणि कदम यांच्या ऑडिओ क्लिपदेखील समोर आणल्या आहेत.

प्रसाद कर्वे नावाचा एक माहिती अधिकार कार्यकर्ता परब यांच्याविरोधात किरीट सोमय्यांना सगळी माहिती पुरवतो, कारवाईसाठी पाठपुरावा करतो आणि मग हाच कार्यकर्ता सगळ्या अपडेट्स शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना पुरवतो, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. संजय कदम यांचे आरोप रामदास कदम यांनी फेटाळले आहेत.

ती ऑडिओ क्लिप खोटी; अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार- कदममनसेच्या वैभव खेडेकरांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही, असे म्हणत कदमांनी आरोप फेटाळून लावले. माझ्या मुलाविरुद्ध विधानसभा निवडणुकीत संजय कदम पराभूत झाले. तेव्हापासून ते सातत्याने माझ्यावर आरोप करत आहेत. वैभव खेडेकरांच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली. त्यामुळे माझी बदनामी करण्यासाठी ते असे आरोप करतात. मी आधीच त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे आणि आता पुन्हा मानहानीचा दावा करणार आहे, असे कदम म्हणाले.

तुळजाभवानीची शप्पथ घेऊन सांगतो...संजय कदम आणि वैभव खेडेकर आधी शिवसेनेतच होते. मग ते इतर पक्षात गेले. त्यांचा राजकीय बाप मीच आहे. खेडेकर यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली. त्यामुळे त्यांचं नगराध्यक्ष जाऊ शकतं. ते वाचवण्यासाठी राष्ट्रवादीला हातीशी घेऊन ते माझ्यावर आरोप करत आहेत. तुळजाभवानीची शप्पथ घेऊन सांगतो, मी सोमय्यांशी संपर्क साधलेला नाही. जो माणूस माझ्या पक्षाच्या मुळावर उठलाय, त्याला पत्रकार परिषदेनंतर मला भेटायला घेऊन ये असं मी का बरं म्हणेन, असा सवाल रामदास कदमांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमShiv Senaशिवसेना