शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवले म्हणतात...'कोई माने या ना माने, बीजेपी में जल्दी आयेंगे नारायण राणे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 15:16 IST

रामदास आठवले म्हणतात...'कोई माने या ना माने, बीजेपी में जल्दी आयेंगे नारायण राणे'

शिर्डी, दि. 18 - भाजपाच्या वाटेवर असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आगामी वाटचालीविषयीची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे. राणे काँग्रेस सोडणार, भाजपात प्रवेश करणार याची चर्चा गेल्या सात आठ महिन्यांपासून रंगली आहे. राणेंच्या भाजपाप्रवेशाबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष(रिपाइं) आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राणे लवकरच भाजपात प्रवेश करतील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत एक कविताही सादर केली. 'कोई माने या ना माने, बीजेपी में जल्दी आयेंगे नारायण राणे' असं म्हणत राणे लवकरच भाजपात जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.  याशिवाय भाजपा घेत नसेल तर रिपाइंमध्ये यावं कारण कॉंग्रेसला आता भविष्य नाही अशी ऑफरही त्यांनी राणेंना देवून टाकली. सिंधुदुर्गात नारायण राणे आज करणार जोरदार शक्तीप्रदर्शन, सभेदरम्यान मोठा निर्णय करणार जाहीर?अखिल भारतीय काँग्रेसने सिंधुदुर्ग काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर प्रथमच काँग्रेस ज्येष्ठ नेते नारायण राणे सिंधुदुर्गात आज  दाखल होणार आहेत. त्यांच्या एन्ट्रीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे.  दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांचे गोवा येथील विमानतळावर आगमन होणार आहे. यानंतर ते जिल्ह्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. शिवाय, कुडाळमध्ये समर्थकांना संबोधितदेखील करणार आहेत. दरम्यान, नारायण राणे भाषणादरम्यान काय बोलणार आहेत? महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करणार आहेत का? याकडे सर्वांचच लक्ष लागून राहिले आहे.  या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नारायण राणे यांचे समर्थक गोव्याकडे रवाना झाले आहेत. बांदा येथे राणे जोरदार शक्तीपदर्शन करणार आहेत.

काँग्रेसची सिंधुदुर्ग कार्यकारिणी बरखास्त 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांचा संभाव्य भाजपा प्रवेश गृहीत धरून सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी अखेर काँग्रेसनं शनिवारी (16 सप्टेंबर) बरखास्त केली. काँग्रेसच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी पक्षाचे सदस्य आणि निष्ठावंत विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड.गणेश पाटील यांनी मुंबईत केली. उर्वरित कार्यकारिणीचे पुनर्गठण हे येत्या 15 दिवसांत  करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त होणार याची चर्चा गेले काही दिवस सर्वत्र होती. आठवड्यापूर्वी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेसचे नेते जिल्ह्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत बैठक झाली. या बैठकीत आमदार नीतेश राणे यांनी प्रदेशच्या नेत्यांना चांगलेच धारेवर धरले हेते तसेच ही बैठक हायजॅकही केली होती. याबाबतचा अहवाल खासदार दलवाई यांनी प्रदेश काँग्रेसला पाठवला होता. याबाबत शनिवारी प्रदेश काँग्रेसची बैठक झाली.

या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.  तसंच सिंधुदुर्ग काँग्रेस अध्यक्षाविना राहू नये, यासाठी तातडीनं जिल्हाध्यक्ष म्हणून विकास सावंत यांची नेमणूक करण्यात आली. असेही प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस गणेश पाटील यांनी सांगितले. 

सावंतवाडीतील बैठकीची अहवाल प्राप्त - अशोक चव्हाण

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. तसंच विकास सावंत यांची नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूकही करण्यात आली आहे. आम्हाला सावंतवाडीतील बैठकीचा अहवाल प्राप्त झाला आहे, असे प्रदेशाध्याक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

राणे यांना धक्का 

हा निर्णय म्हणजे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना जोरदार धक्का मानला जात आहे. राणे यांच्या भाजपा प्रवेशापूर्वी काँग्रेसच्यावतीनं उचललेले हे पाऊस असून, सिंधुदुर्गात राणे समर्थकांनी राणए यांनाच मानणा-यांना सरपंचपदाची उमेदवारी दिली जाईल, असे जाहीर केले होते. गणेश चतुर्थीच्या काळात जिल्ह्यात लावण्यात आलेल्या बॅनवरुन काँग्रेसच्या पंजाचे चिन्ह गायब झाले होते. प्रदेश काँग्रेसकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसच्या सभासद नोंदणीसाठी सहा हजार पुस्तकं पाठवण्यात आली होती. परंतु ती सभासदांकडे दिली नाहीत. याची गंभीर दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

दस-यापूर्वी सीमोल्लंघन, ‘त्यांना’ जागा दाखवून देईन - नारायण राणे

पक्षप्रवेशावेळी दिलेले एकही आश्वासन काँग्रेसने पाळले नाही. त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याची कारवाई करण्यात आली. जी मंडळी या कारवाया करत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे सांगतानाच येत्या नवरात्रीतच या सर्व प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणार असल्याचे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी रविवारी स्पष्ट केले.राणे यांची भाजपाशी वाढलेली जवळीक लक्षात घेत; काँग्रेसने राणे समर्थक दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करून पक्षाचे निष्ठावंत विकास सावंत यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली. या निर्णयामुळे संतप्त झालेले राणे म्हणाले, कोणतीही माहिती न देता ही नेमणूक झाली आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे हे षड्यंत्र आहे. या दोघांनी काँग्रेस संपवायचे काम चालविले आहे. सिंधुदुर्गात ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत सर्व सत्ता काँग्रेसकडे आहे. राज्यात काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व असणारा सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा आहे. ज्यांनी ही सत्ता मिळवून दिली अशा पदाधिका-यांना घरी बसविण्याचे काम काँग्रेसने केल्याचा आरोप राणे यांनी केला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे