शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राम जन्मला १ जानेवारी इसवी सन पूर्व ५६४८ साली

By admin | Updated: April 3, 2017 02:33 IST

दरवर्षी चैत्र शुक्ल नवमी तिथी मध्यान्हकाली असेल, त्या दिवशी आपण ‘श्रीरामजन्म उत्सव’ साजरा करीत असतो

मुंबई : दरवर्षी चैत्र शुक्ल नवमी तिथी मध्यान्हकाली असेल, त्या दिवशी आपण ‘श्रीरामजन्म उत्सव’ साजरा करीत असतो, परंतु इंग्रजी - ग्रेगरियन तारखेप्रमाणे श्रीरामाचा जन्म कधी झाला, हे आपणास माहीत नसते. मात्र, आता हा इतिहास गवसला आहे. कल्याण येथे राहणारे निवृत्त अभियंता प्रफुल्ल वामन मेंडकी यांनी संपूर्ण रामायणात उल्लेख केलेल्या खगोलीय घटनांचा अभ्यास आणि संशोधन करून, रामायणातील घटनांचा काल शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे. मेंडकी यांनी संशोधनाद्वारे श्रीराम जन्माची तारीख १ जानेवारी इसवी सन पूर्व ५६४८, चैत्र शुक्ल नवमी असल्याचे दाखविले आहे, असे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.प्रफुल्ल मेंडकी यांच्या संशोधनाविषयी माहिती देताना सोमण म्हणाले की, आतापर्यंत अनेक विद्वानांनी रामायणाचा काल निश्चित करण्याचे प्रयत्न केले आहेत, परंतु त्यांच्यामध्ये मतभिन्नताच आढळते, त्या वेळी संगणक उपलब्ध नव्हता. प्रफुल्ल मेंडकी यांनी संपूर्ण रामायणात निरनिराळ्या प्रसंगी वर्णन केलेली ग्रह-नक्षत्रांची स्थिती, पौर्णिमा-अमावास्यांचा उल्लेख, चंद्र-सूर्य ग्रहणांचे संदर्भ, चांद्रमासात होणारा बदल लक्षात घेऊन, संगणकाचा आणि आधुनिक गणिताचा वापर करून रामायणकालाचे संशोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. संशोधन करीत असताना, त्यांनी नासा संस्थेतील शास्त्रज्ञांचीही मदत घेतली आहे. (प्रतिनिधी)>महाभारतावरही संशोधनपुणे येथील पुष्पक प्रकाशन संस्थेने प्रफुल्ल मेंडकी यांचे हे संशोधन ‘रामायणाचा खगोलशास्त्रीय शोध’ या नावाने पुस्तक रूपात प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाला प्रा. मोहन आपटे यांची प्रस्तावना लाभली आहे. मेंडकी यांनी महाभारत कालावरदेखील संशोधन केले असून, तेही पुस्तक रूपाने लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे सोमण यांनी सांगितले.>भविष्यातील पिढीसाठी उपयुक्त संशोधनमेंडकी यांचे हे संशोधन पुढील काळात अधिक संशोधन करणाऱ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही सोमण यांनी व्यक्त केला. सुमारे साडेसात हजार वर्षांपूर्वी घडलेल्या रामायणातील या घटनांचा काल ठरविणे हे खूप कठीण काम आहे. कदाचित काही ठिकाणी खगोलीय घटनांचा उल्लेख सापडलाही नसेल, सध्या गृहित धरल्या गेलेल्या गोष्टींशी संशोधित निष्कर्ष जुळत नसतील, परंतु प्रफुल्ल मेंडकी यांनी प्रामाणिकपणे रामायणात उल्लेखल्या गेलेल्या खगोलीय घटनांचा आधार घेऊन, संशोधनाचा केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे, असेही सोमण यांनी म्हटले आहे.विशेष म्हणजे, रामायणाच्या कालात ऋतूंच्या प्रारंभीचे चांद्रमहिने निराळे होते. कारण चंद्र पृथ्वीपासून हळूहळू दूर जात आहे आणि पृथ्वीच्या परिवलनाची गतीही मंदावत आहे. या सर्व गोष्टींचा विचार प्रफुल्ल मेंडकी यांनी हे संशोधन करताना केलेला आहे. कालमानाचे हे गणित करीत असताना, ‘डेल्टा टी’ नावाची कालशुद्धी करावी लागते. त्यामुळे गणितात अचूकता येत असते, तीही त्यांनी रामायणकाल ठरविताना केली आहे.