शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार! सप्टेंबरचे १५०० रुपये लवकरच मिळणार, तारीख आली समोर
2
"क्या बड़ा तो सबसे दम बड़ा, राग आला की...", गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
3
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा; कर्मचाऱ्यांना मारहाण केली, लाखो रुपये पळवले
4
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
5
जर्मनीपासून एक पाऊल दूर! ट्रम्प यांच्या निकटवर्तीयानंही मान्य केली भारताची ताकद, भागीदारीसाठी हात पुढे
6
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
7
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
8
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
9
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
10
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
11
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
12
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
13
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
14
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
15
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
16
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
17
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
18
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
19
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
20
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला

राममंदिर संतच बांधणार

By admin | Updated: February 2, 2015 01:12 IST

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम राजकीय पक्ष नव्हे तर शंकराचार्य करणार असून विश्व हिंदू परिषद त्याला सहकार्य करू शकते, राम मंदिर कोणत्याही पक्षाचे नव्हे तर ते हिंदू धर्माचे असावे,

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांची माहितीनागपूर: अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम राजकीय पक्ष नव्हे तर शंकराचार्य करणार असून विश्व हिंदू परिषद त्याला सहकार्य करू शकते, राम मंदिर कोणत्याही पक्षाचे नव्हे तर ते हिंदू धर्माचे असावे, असे ज्योतिषपीठ व द्वारका-शारदापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.अयोध्येत तीनही शंकराचार्यांद्वारा समर्थित रामालय ट्रस्ट हे मंदिराचे बांधकाम करणार असून ते कंबोडियातील अकराशे वर्षे जुन्या श्रीराम मंदिराच्या धर्तीवर असेल. विश्व हिंदू परिषदेला मात्र बिर्ला मंदिराप्रमाणे हे मंदिर बांधायचे आहे, असे शंकराचार्य म्हणाले. शिर्डी येथे होणाऱ्या साई समाधी शताब्दी महोत्सवाला त्यांनी विरोध केला. साईबाबांचा महोत्सव साजरा केल्यास सार्इंच्या नावाने हिंदू समाजात अंधविश्वास पसरेल, असे ते म्हणाले. साईबाबांना हिंदू देव-देवतांप्रमाणे सादर करण्याचा कट भारतच नव्हे तर विदेशातूनही रचला जात आहे. विष्णू, सरस्वती,श्रीकृष्ण यांच्या चित्रांवर साईबाबांचा चेहरा लावून त्यांना देवतेच्या रूपात सादर केले जाते. अशा प्रकारचे दोन संकेतस्थळ मलेशिया आणि दक्षिण आफ्रिकेतून संचालित होत आहे. यावर तत्काळ प्रतिबंध घालावा अशी मागणी सरकारकडे केली आहे, असे त्यांनी सागितले. अलाहाबाद कुंभ मेळाव्यात झालेल्या धर्म संसदेत हिंदू धर्माच्या हितार्थ नऊ प्रस्ताव पारित करण्यात आले होते. त्यात हिंदू धर्मापुढे असलेल्या समस्यां विरुद्ध लढण्याची तयारी करणे, गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी त्यावर कुठलाही बांध न बांधणे, नाले बंद करणे, संपूर्ण देशात गोहत्या बंदी, सनातन हिंदू धर्माचे साईकरण बंद करावे, ‘पी.के.’चित्रपट रिलीज करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाला जबाबदार धरणे, हिंदूंचे धर्मांतरण समग्र स्वरूपात व्हावे, भारताची मूळ भाषा संस्कृतला प्रोत्साहन द्यावे आदींचा त्यात समावेश होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.(प्रतिनिधी)हिंदू मुलांची संख्या वाढविणे उपाय नाहीराजकीय दृष्टिकोन ठेवून हिदूंनी मुलांची संख्या वाढविली तर प्रतिस्पर्धी अल्पसंख्यक समाजही त्याचे अनुकरण करेल. यामुळे लोकसंख्येचा स्फोट होईल. लोकसंख्या संतुलित ठेवायची असेल तर अन्य धर्मीयांनाही हिंदूं धर्माप्रमाणेच कुटुंब नियोजनाचा नियम लागू करावा,असे शंकराचार्य म्हणाले. जोपर्यंत मन आणि आचरणाने शुद्ध होत नाही तोपर्यंत ‘घर वापसी’च्या नावावर दुसऱ्यांचे धर्मांतरण करणे उपयोगी नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.