शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

राम मंदिर आज नाही तर कधीच नाही - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 13, 2016 12:12 IST

शिवसेना व इतर पक्षांसह भारतीय जनता पक्षाने बहुमताचे शिखर गाठले आहे. त्यामुळे ३०० खासदारांच्या जोरावर राममंदिराची उभारणी नाही करणार तर कधी करणार असा सवाल उद्धवनी मोदींना विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ -  ' शिवसेना व इतर पक्षांसह भारतीय जनता पक्षाने बहुमताचे शिखर गाठले आहे. त्यामुळे ३०० खासदारांच्या जोरावर राममंदिराची उभारणी नाही करणार तर कधी करणार?' असा सवाल विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राममंदिराची उभारणी करण्याचे फर्मान सोडले आहे. ' राममंदिर आज नाही तर कधीच नाही. नुसते नारे देऊ नका, विटा रचायला सुरुवात करा. कळस चढवायचे काम शिवसेना करीलच' असेही उद्धव यांनी 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे. 
उत्तर प्रदेशातील निवडणुका म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी जीवन-मरणाचा असल्याची आठवण करून देतानाच राममंदिराचे राजकारण जेवढे व्हायचे तेवढे झालेच आहे,  आता त्यावर वेळ वाया न घालवता हे काम तडीस न्यावे, असा सल्ला उद्धव यांनी दिला आहे. 
(‘अच्छे दिन’च्या रणभेदी फुंकल्या तरी ‘रावणां’चा आकडा तेवढाच - उद्धव ठाकरे)
(राममंदिराचा कळस उतरला, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला)
 
 
 
अग्रलेखातील महत्वपूर्ण मुद्दे : 
 
- पाकिस्तानवर केलेल्या ‘सर्जिकल’ हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. लखनौ येथे दसरा मेळावा घेऊन पंतप्रधानांनी जय श्रीरामाचा नारा दिला आहे. मोदी यांनी व्यासपीठावरून दोन वेळा ‘जय श्रीराम’चा नारा देऊन उत्तर प्रदेश विधानसभेच्या प्रचाराचा ‘शंख’ फुंकला आहे. उत्तर प्रदेशात किती हालचाली झाल्या ते लवकरच कळेल. उत्तर प्रदेशातील निवडणुका म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी जीवन-मरणाचा प्रश्‍न आहे.
 
-  स्वत: मोदी हे वाराणसी येथून लोकसभेवर निवडून गेले आहेत व पंतप्रधान होताच त्यांनी काशीला येऊन गंगा आरती केली. त्यामुळे ‘भाजप’ची छाती फुगली व हिंदुत्ववाद्यांची मनगटे फुरफुरली नसती तर नवलच. आतापर्यंत पंतप्रधान होताच नेते मशिदींचे दर्शन घेत. सर्वधर्मसमभावाच्या गप्पा मारीत, पण मोदी हे पहिलेच पंतप्रधान असे की, त्यांनी शपथ घेताच गंगा आरतीचे प्रयोजन केले व त्याचा चांगलाच परिणाम झाला. मोदी यांना त्यावेळीच विचारले होते की, ‘आता राममंदिर केव्हा?’ तेव्हा ठोस उत्तर रामभक्तांना मिळाले नाही. कारण लोकसभा विजयाचा जोश होता. पण आता त्या विजयाचा जोश संपला आहे व विधानसभा निवडणुकांचा शंखनाद सुरू झाल्याने माहौल तयार झाला आहे. त्यामुळेटविधानसभेसाठी ‘जय श्रीराम’चा नारा झाल्याची टीका विरोधकांनी सुरू केली. 
 
- पंतप्रधानांनी लखनौला येऊन ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने राममंदिराची स्थापना होऊन सोन्याचा कळस चढेल या भावनेतून भाजपला मते मिळतील व राममंदिर झाले नाही तरी उत्तर प्रदेशात सत्तामंदिरी कमलपुष्पांचे अर्पण होईल. या भावनेतून सर्व चालले आहे. राममंदिराचे राजकारण जेवढे व्हायचे तेवढे झालेच आहे. आता किती राजकारण करायचे ते एकदा ठरवून टाका.