मुंबई : रुग्णांचे नातेवाईकच डॉक्टरांना मारहाण करत असल्याने उच्च न्यायालयाने शासकीय व महापालिका रुग्णालयांमध्ये पुरेसे शस्त्रधारी पोलीस नेमण्याचे निर्देश दिले होते. मात्र सरकारने जे. जे., सायन, नायर यांसारख्या मोठ्या रुग्णालयांत अवघे दोन हवालदार नेमले आहेत. तर कामा, कूपर या रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी एकही पोलीस नेमण्यात आला नाही. ही विदारक स्थिती आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना बुधवारपर्यंत पोलीस महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडून सूचना घ्या. अन्यथा आदेश देऊ, असा इशारा दिला. मुंबईच्या रुग्णालयांत शस्त्रधारी पोलीस नियुक्त करण्याबाबत पोलीस महासंचालक व आयुक्तांकडून सूचना घ्या. अन्यथा आम्हीच आदेश देऊ, असे म्हणत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी बुधवारी ठेवली. (प्रतिनिधी)
डॉक्टरांची सुरक्षा रामभरोसे
By admin | Updated: June 29, 2016 04:24 IST