शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा नंदुरबारात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 17:33 IST

मुस्लिम समाजाला राज्य शासनाने पाच टक्के आरक्षणाची निश्चिती केली होती़ न्यायालयानेही हे आरक्षण वैध ठरवले होते. मात्र या अध्यादेशाची कालमर्यादा संपूनही शासन

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि.18 -  मुस्लिम समाजाला राज्य शासनाने पाच टक्के आरक्षणाची निश्चिती केली होती़ न्यायालयानेही हे आरक्षण वैध ठरवले होते. मात्र या अध्यादेशाची कालमर्यादा संपूनही शासन मुस्लिम समाजाला आरक्षण देत नाही, हा अध्यादेश तात्काळ लागू केला जावा, या मागणीसाठी हजारो मुस्लिम समाज बांधवांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.शहरातील इलाही चौकातून या मोर्चाला सुरूवात करण्यात आली़. मोर्चाची वेळ ११ वाजेची असली तरी, याठिकाणी आठ वाजेपासून दोन-दोनच्या रांगेत युवक व नागरिक मोर्चात सहभागी होण्यासाठी येत होते. नंदुरबार शहरातील मुस्लिम समाजबांधव स्वच्छेने येऊन रांगेत जागा घेत होते. ईलाही चौक ते मच्छीबाजार या दरम्यान मोठी रांग लावण्यात आली होती़. जमात-उलेमा-ए-ंिहंद व मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. एक तास सुरू असलेल्या या मोर्चात कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न करता, केवळ मूकपणे मागण्यांचे फलक युवक दाखवत होते़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित जमाए-उलेमा-ए-हिंद या संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष मौलाना जकेरिया रहेमानी यांनी मार्गदर्शन केले. मंगळवारी जमात-उलेमा-ए-हिंद या संघटनेने राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तर तालुकास्तराव धरणे आंदोलन करण्यात आले होते. मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.