शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

राकेश मारिया यांच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: July 17, 2014 02:35 IST

विनिता कामटे यांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलाचे प्रमुख राकेश मारिया यांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिले आहेत.

मुंबई : मुंबई शहरावर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस अधिकारी अशोक कामटे यांच्याबाबतची सूचना थांबविण्यासह त्यांच्या पत्नी विनिता कामटे यांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलाचे प्रमुख राकेश मारिया यांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिले आहेत.मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी नुकताच एक आदेश दिला होता. आदेशानुसार, राज्य सरकारला चौकशी आयोग कायद्यान्वये एका सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करण्यास सांगितले होते. ही समिती कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांना राकेश मारिया यांनी दिशाभूल करणारी माहिती दिली होती की नाही, याचा तपास करणार होती. ९ जुलै रोजी रत्नाकर गायकवाड यांनी तीन पानी आदेश जारी केला असून; त्या आदेशात या प्रकरणी दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, दहशतवादी हल्ल्यावेळी नियंत्रण कक्षातून कामटे, विजय साळसकर आणि हेमंत करकरे यांच्याशी झालेल्या संवादाची माहिती विनिता कामटे यांनी माहिती अधिकारातंर्गत मागितली होती. प्रथम ती नाकारण्यात आली होती. आणि नोव्हेंबर २००९ आणि फेब्रुवारी २०१० रोजी त्यांना पुरविण्यात आलेली माहिती अर्धवट आणि विसंगत होती. मारिया हे विनिता कामटे यांना माहिती देण्यास परवानगी देत नव्हते. ही बाब अतिशय बेजबाबदार आहे. या प्रकरणात ते काही माहिती लपवू पाहात आहेत का, असेही यात म्हटले आहे. (प्रतिनिधी)