शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
7
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
8
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
9
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
10
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
11
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
12
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
13
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
14
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
15
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
16
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
17
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
18
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
19
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
20
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

राकेश रोशन व जी. एस. बावा यांच्यावर कारवाई करा

By admin | Updated: April 17, 2017 20:31 IST

अभिनेते राकेश रोशन व हॉटेल व्यावसायिक जी. एस. बावा यांच्यावर कारवाई करा, राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार टपरी हातगाडी व्यावसायिकांना परवाने व जागा मोजून द्या

ऑनलाइन लोकमतलोणावळा, दि. 17 - राजमाची पाँईट परिसरात वर्षानुवर्षे टपरी व हातगाडी व्यावसाय करत जीवन जगणार्‍या व्यावसायिकांना धनशक्तीच्या जोरावर धमकावत तसेच शासकीय अधिकारी यांना हाताशी धरत दडपशाहीचा वापर करून त्रास देत त्यांचा व्यवसाय बंद करायला लावणारे अभिनेते राकेश रोशन व हॉटेल व्यावसायिक जी. एस. बावा यांच्यावर कारवाई करा, राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार टपरी हातगाडी व्यावसायिकांना परवाने व जागा मोजून द्या, या मागणीसाठी आज टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अमृतांजन पॉइंटजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी आरपीआयचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत, संघटनेचे जिल्हाध्यक्ष मल्हार कांबळे, महाराष्ट्र सचिव प्रल्हाद कांबळे, लोणावळा अध्यक्ष गणेश चव्हाण, तळेगाव अध्यक्ष किरण साळवे, शाखा अध्यक्ष संदीप रोकडे, महिला अध्यक्ष लक्ष्मीबाई सूर्यवंशी यांच्यासह व्यावसायिक या आंदोलनात सहभागी झाले होते.राजमाची पॉइंटसमोरील जागा अभिनेते राकेश रोशन यांनी विकत घेतली आहे. या जागेच्या समोर व जुन्या राष्ट्रीय महामार्गाच्या विरुद्ध बाजूला मागील काही वर्षांपासून स्थानिक नागरिक टपरी व हातगाडी व्यावसाय करतात. मात्र आपल्या जागेसमोर हातगाड्या व टपर्‍या उभ्या राहत असल्याने राकेश रोशन व जी. एस. बावा यांनी आयआरबीचे व एमएसआरडीसीचे अधिकारी यांना हाताशी धरून आम्हाला दमदाटी करत आमच्या टपर्‍या व हातगाड्यांचे नुकसान केले. बावा हे लाल दिव्याच्या गाडीतून येऊन आम्हाला दमदाटी करतात, असा या व्यावसायिकांचा आरोप आहे. राजमाची पॉइंट हा उंच भिंत बांधत बंद करण्याचा कुटील डाव अधिकारी व गोरगरिबांना त्रास देणार्‍यांनी आखला असल्याने सदरहू भिंतीचे काम तातडीने बंद करा, अशी मागणी देखील संघटनेने यावेळी केली. अतिक्रमणांच्या नावाखाली टपरी व हातगाडी व्यवसायिकांवर कारवाई करणारे अधिकारी धनिकांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा करत आहेत. लाल दिव्याच्या गाडीतून येऊन टपरी व्यावसायिकांना धमकाविणारे जी. एस. बावा यांच्या बंगल्याचे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण आहे. राकेश रोशन यांची संरक्षण भिंत हे रस्त्यात अतिक्रमण आहे. लोणावळा व खंडाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणांचा विळखा वाढत असताना अधिकारी मात्र गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करण्यात धन्यता मानत आहेत, असा आरोप हातगाडी, पथारी व टपरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मल्हार कांबळे यांनी केला.