शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

RajyaSabha Election Maharashtra: मविआच्या प्रस्तावावर दिल्लीतून निरोप आला; चंद्रकांत पाटलांनी सांगितले चर्चेत काय काय घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 13:08 IST

बैठक संपल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी दिल्लीला मविआच्या प्रस्तावाचा निरोप कळविल्याचे सांगितले. यावर आपली भूमिकाही सांगितली.

मविआचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. यावेळी दोन्ही बाजूंकडून एकमेकांना एकसारखीच ऑफर देण्यात आली. यामध्ये राज्यसभेचा उमेदवार माघारी घ्या, त्याबदल्यात विधानपरिषदेला जागा देऊ, असा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला भाजपाने नकार दिला आहे, तर आम्ही यावर विचार करतो, असे सांगून मविआ नेते बाहेर पडल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

RajyaSabha Election Maharashtra: मविआ नेत्यांनी फडणवीसांची भेट का घेतली? शिवसेना संकटात; मोठे कारण समोर आले

RajyaSabha Election Maharashtra: अखेर फडणवीसांनी फासे टाकलेच! मविआला शब्द दिला, पण...; भाजप नेत्यांची बैठक सुरु

बैठक संपल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी दिल्लीला मविआच्या प्रस्तावाचा निरोप कळविल्याचे सांगितले. यावर आपली भूमिकाही सांगितली. यावर दिल्लीवरून आम्हाला तुमची भूमिका योग्य असल्याचे कळविण्यात आल्याचे पाटील म्हणाले. शिवसेनेकडे एकडून तिकडून जोडलेली तीस मते देखील नाहीत. तर आमच्याकडे तीस मते आहेत. आमचा पक्ष राष्ट्रीय आहे. त्यामुळे राज्यसभेची जागा आमच्यासाठी महत्वाची आहे. मविआने राज्यसभेचा उमेदवार मागे घेतला तर आम्ही विधानपरिषदेची पाचवी जागा लढविणार नाही, असे आम्ही मविआच्या नेत्यांना सांगितल्याचे पाटील म्हणाले. 

महाविकास आघाडीच्या नेत्यांचा काल देवेंद्र फडणवीसांना फोन आला होता. राज्यसभेच्या उमेदवारीचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यावरून चर्चा करायची असल्याने आमचे ज्येष्ठ नेते सकाळी भेटण्यासाठी येतील, अशी विनंती त्यांनी केली. तेव्हाच फडणवीस यांनी त्यांना आम्ही उमेदवारी माघारी घेणार नाही, तुम्ही जो प्रस्ताव घेऊन याल त्यावरू विचार करू, असे म्हटले होते. आज त्यांनी दिलेला प्रस्ताव आम्हाला मान्य नाही, आम्ही आमचा तिसरा उमेदवार मागे घेणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 

महाविकास आघाडीची भाजपाला ऑफर; ३ वाजेपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर...

शिवसेनेकडे जादाची १३ मते आहेत. राष्ट्रवादीचे दोन आमदार तुरुंगात आहेत. त्यामुळे ते मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांची ८-९ मते आहेत. याउलट आमच्याकडे ३० मते आहेत. यामुळे त्यांनी उमेदवारी माघारी घ्यावी, ही वस्तूस्थिती चर्चेमध्ये मांडली. चर्चा खेळीमेळीत झाल्याचे पाटील यांनी सांगितले. 

गेल्या 20 वर्षांची परंपरा आहे की, राज्यसभा-विधान परिषदेत जर निवडणुका झाल्या तर क्रॉस वोटिंग होतं आणि प्रचंड गोंधळ होतो. परंतू ज्यावेळी बिनविरोध होते त्यावेळी वस्तूस्थितीच्या आधारे होते. त्यामुळे आमचा आग्रह आहे की, राज्यसभेच्या भाजपला तीन जागा मिळाव्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या बाबतीत काही विचार करता येईल. मविआच्या नेत्यांनी खूप चर्चा झाल्यावर तोच-तोच प्रस्ताव मांडला, असेही पाटील म्हणाले.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलRajya Sabhaराज्यसभाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना