शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election: हनुमान चालीसा दाखवली म्हणून रवी राणांचे मत बाद करावं: शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 19:39 IST

भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आता शिवसेनेनेही तक्रार दाखल केली आहे.

मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मोठी रंगत आली आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी २८५ आमदारांनी मतदान केले. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ३ जणांनी मतदान प्रक्रियेच्या नियमांचे भंग केल्याचा आरोप करत भाजपाने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. जोवर निवडणूक आयोगाचा निर्णय येत नाही तोवर मतमोजणी प्रक्रिया खोळंबली आहे. त्यात आता शिवसेनेनेही निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्याची बातमी समोर आली आहे. 

शिवसेनेनेही रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदानावेळी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणूक प्रतिनिधी व्यतिरिक्त मुनगंटीवार यांनी इतर व्यक्तीला मतपत्रिका दाखवली. तर रवी राणा यांनी हनुमान चालीसा दाखवून मतदान केले. हनुमान चालीसा दाखवून इतर कुणाला मतदान केले हे उघड करणं  नियमांचे भंग आहे असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे ही मते बाद करावीत अशी तक्रार शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. 

रवी राणा म्हणाले होते की, मी १०१ वेळा हनुमान चालीसेचं पठण करून विधान भवनात आलो आहे. याठिकाणी भाजपाच्या तिन्ही उमेदवाराचा विजय होईल. ज्यांनी वारंवार हनुमान चालीसा, रामाचा अवमान केला. माझ्यावर राजद्रोह दाखल केला. हनुमान चालीसेचं पुस्तक खिशात घेऊन जाणे, विधान भवनात जाणे हा गुन्हा आहे का? असं त्यांनी म्हटलं आहे. तर राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरू झाला, आम्हीच जिंकू, जय महाराष्ट्र अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आता शिवसेनेनेही तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने व्हिडिओ फुटेज मागवलं आहे. व्हिडिओ पाहून पुढील निर्णय होईल. परंतु या प्रक्रियेला किती वेळ लागेल सांगता येत नाही. मात्र राज्यसभेच्या निवडणूक मतमोजणीला ब्रेक लागला आहे. कदाचित या मतमोजणीला मध्यरात्र किंवा उद्या सकाळही उलटू शकते असं म्हटलं जात आहे. भाजपा आमदार पराग अळवाणी यांनी महाविकास आघाडीच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप घेत ही मते बाद करावीत अशी मागणी केली. तर भाजपाचे नेते बावचळेत असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी केला. परंतु आता याबाबत भाजपाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभा