शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

हालचालींना वेग; बॅगा घेऊन शिवसेनेचे आमदार मुंबईत! आज पुन्हा शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 06:52 IST

rajya sabha election 2022 : आयसोलेशनमध्ये असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना फोनाफोनी केली.  भाव वाढलेले अपक्ष आमदार वेगवेगळी वक्तव्ये करून लक्ष वेधून घेत आहेत.     

मुंबई : सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येत असताना सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपच्या गोटातील हालचालींना सोमवारी वेग आला. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार बॅगा घेऊन मुंबईत दाखल झाले असून, पुढील तीन दिवसांसाठी त्यांची सोय ‘रिट्रीट’ हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. आयसोलेशनमध्ये असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना फोनाफोनी केली.  भाव वाढलेले अपक्ष आमदार वेगवेगळी वक्तव्ये करून लक्ष वेधून घेत आहेत.     कट्टर शिवसैनिकासाठी ही लढाई लढायची. कुणालाही घाबरायचे नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. 

आज पुन्हा शक्तिप्रदर्शन- मंगळवारी सायंकाळी नरिमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व तसेच सहयोगी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.- महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना वांद्रे-कुर्ला संकुलात अशाच पद्धतीने तीनही पक्षांच्या आमदारांची बैठक झाली होती. त्यातून आपले संख्याबळ आघाडीने दाखवून दिले होते. - अशाच पद्धतीचे शक्तीप्रदर्शन या बैठकीतून करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि पक्ष निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे मार्गदर्शन करणार आहेत.

सुप्रिया सुळे यांनी घेतली जोरगेवारांची भेट- वेगवेगळी राजकीय विधाने करून चर्चेत असणारे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. - राज्यसभेसाठी घोडेबाजार होत आहे. हे दुर्दैवी आहे. आमचे दोन नेते काहीही न करता तुरुंगात आहेत हा अन्याय आहे. दोघांना मतदानाची संधी मिळावी यासाठी छगन भुजबळ प्रयत्न करीत असल्याचे सुळे यांनी सांगितले.

शेवटच्या पाच मिनिटात मतदान : बच्चू कडूमुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलून धानखरेदी सुरू करावी, अन्यथा निवडणुकीत शेवटच्या पाच मिनिटात मतदान करू, असा गर्भित इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीत मुख्यमंत्र्यांना दिला. 

आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पत्ते गुलदस्त्याततीन आमदारांचे पाठबळ असलेल्या बहुजन विकास आघाडीची मनधरणी महाविकास आघाडीसह भाजपही करत आहे. वसई-विरारची कामे करणार, त्यालाच मते मिळणार, असे हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले. 

भाजपकडून घोडेबाजार, पटोले यांचा आरोपभाजपने कितीही घोडेबाजार केला, केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग कितीही केला तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेची निवडणूक जिंकतील. - नाना पटोले, प्रदेश अध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभा