मुंबई : जनतेने भाजपाला सत्ता दिली ती विकास करण्यासाठी; घटनेत बदल करण्यासाठी नव्हे, शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत संविधान वाचविण्यासाठी संघर्ष करू, असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे बोलून दाखविला.संविधान बचाव रॅलीसंदर्भात माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. काँग्रेसचे खासदार राजीव सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यावेळी उपस्थित होते.संविधान बचाव रॅली अराजकीय आहे. या रॅलीत कोणताच नेता भाषण करणार नाही, कोणत्याही पक्षाचा झेंडा वापरणार नाही. संविधानाबाबत बांधिलकी असणारे नेते यात सहभागी होतील, असेही शेट्टी यांनी सांगितले. तर शरद पवार, शरद यादव, सीताराम येचुरी, सुशिलकुमार शिंदे, डी. राजा, तुषार गांधी, अल्पेश ठाकूर यांच्यासह राजकारण, समाजकारण, कला आदी क्षेत्रांतील लोक सभेत सहभागी होतील, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.धर्मा पाटील यांची विचारपूसमंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाºया शेतकरी धर्मा पाटील यांची जे.जे. रुग्णालयात जाऊन राजू शेट्टी यांनी विचारपूस केली. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, रविकांत तुपकर, अनिल पवार आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी - सातवसंविधान बचाव रॅलीला उत्तर म्हणून, तिरंगा रॅली काढण्यापूर्वी तिरंगा ध्वजाला विरोध करणाºया पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केली....तर दिल्लीत जाऊन आत्महत्या करेनदरम्यान, धर्मा पाटील यांच्या मुलाने सरकारने दिलेली १५ लाख रुपयांची मदत नाकारली आहे. वडिलांनी मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जर सरकारने योग्य मदत केली नाही तर मी दिल्लीत जाऊन आत्महत्या करेन, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला.
रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत संविधानासाठी संघर्ष करू : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 03:58 IST