शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

१६ जुलैनंतर मुंबईचा दूध पुरवठा तोडणार, राजू शेट्टी यांनी फुंकले रणशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 06:11 IST

राज्य सरकारने कर्नाटकच्या धर्तीवर गायीच्या दूधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय

पुणे/ कोल्हापूर : राज्य सरकारने कर्नाटकच्या धर्तीवर गायीच्या दूधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय १५ जुलैपर्यंत न घेतल्यास १६ जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी येथे दिला.कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांतून एक लिटरही दूध मुंबईकडे जाणार नाही अशी व्यवस्था केली जाईल व त्यातून जी परिस्थिती उदभवेल त्यास सरकार जबाबदार असेल असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.ऊस उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी टिळक चौक ते साखर संकुल दरम्यान विराट मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी त्यामध्ये सहभागी झाले होते. मोर्चात शेतकºयांनी आसूड ओढून वेगळेच वातावरण तयार केले. शेतकरी आसूड ओढताना पुणेकर जनता उत्सुकतेने पाहत होती.शेट्टी म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणांबाबत आम्ही संयम ठेवला आहे. यापुढे शेतकºयांची लूट होऊ देणार नाही. १५०० कोटी रुपयांची उसाची थकीत एफआरपी येणे बाकी आहे. व्याजाची रक्कम शेतकºयांनी का द्यावी? एफआरपीची रक्कम देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्यांकडे तब्बल ६० कोटी थकीत आहे. ३० जुलैपर्यंत थकीत रक्कम देण्यात यावी अन्यथा मंत्र्यांच्या घरावर जप्ती आणावी लागेल.मुख्यमंत्र्यांवरही टीकेची झोडविदर्भात पिककर्ज देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाºयाने शेतकºयाच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केली. परंतु त्यास लगेच जामीन मंजूर झाला याबद्दल संतप्त शब्दात समाचार घेवून शेट्टी म्हणाले,‘ असा प्रकार पुन्हा घडलाच तर जाग्यावर त्या अधिकाºयाचे डोळे फोडा, तरच शेतकºयाच्या पत्नीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुणाची होणार नाही. मुख्यमंत्र्यांच्याकडे गृहखाते आहे. त्यांना या घटनेचे कांहीच कसे वाटले नाहीत. ते झोपले आहेत का अशी विचारणा खासदार शेट्टी यांनी केली.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी