शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रजनी करकरे - देशपांडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 01:20 IST

कोल्हापूर : सुगम संगीताच्या ज्येष्ठ गायिका व हेल्पर्स आॅफ हॅन्डीकॅप्ड या संस्थेच्या उपाध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रजनी करकरे - देशपांडे (वय ७४) यांचे शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास निधन झाले.

ठळक मुद्दे ‘हेल्पर्स’चा आधार हरपला: आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार पराकोटीच्या अपंगत्वावर मात करत त्यांनी संगीत क्षेत्रात नाव मिळविले. महागायक अभिजित कोसंबी, प्रसन्नजित कोसंबी, शर्वरी जाधव, आदी शिष्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सुगम संगीताच्या ज्येष्ठ गायिका व हेल्पर्स आॅफ हॅन्डीकॅप्ड या संस्थेच्या उपाध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रजनी करकरे - देशपांडे (वय ७४) यांचे शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाने सुगम संगीत व दिव्यांगांच्या विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.श्वसन यंत्रणेतील बिघाडामुळे ३ आॅगस्टपासून येथील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांना फिट्सचाही त्रास सुरू झाला होता. फुफ्फुसाच्या विकाराने रात्री सव्वाअकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती पी. डी. देशपांडे आहेत. अंत्यसंस्कार आज, रविवारी सकाळी आठ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत होणार आहेत.

रजनीताई यांना वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओ झाला होता. पराकोटीच्या अपंगत्वावर मात करत त्यांनी संगीत क्षेत्रात नाव मिळविले. तीस वर्षांहून अधिक काळ आकाशवाणी पुणे, औरंगाबाद, सांगली, आदी केंद्रावरून गायनाचे कार्यक्रम सादर केले. विविध संस्थांच्या निमंत्रणावरून त्यांनी मैफिली सादर केल्या. ‘आनंदाचे डोही’ या त्यांच्या कार्यक्रमाचे एक हजारहून अधिक प्रयोग झाले आहेत. वरात, हे दान कुंकवाचे, दैवत, आदी सिनेमांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. १९८४ मध्ये नसिमा हुरजुक यांच्याबरोबर हेल्पर्स आॅफ दि हॅन्डीकॅप्ड या संस्थेची त्यांनी स्थापना केली. गेली तीस वर्षे या संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणून त्या काम पाहात होत्या. सुचित्रा मोर्डेकर यांच्याबरोबर कलांजली या संस्थेची स्थापना करून सुगम संगीत मार्गदर्शनाचे वर्ग सोळा वर्षांहून अधिक काळ त्यांनी चालविले. महागायक अभिजित कोसंबी, प्रसन्नजित कोसंबी, शर्वरी जाधव, आदी शिष्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.१५ आॅगस्टला विवाहरजनीतार्इंना वयाच्या पाचव्या वर्षी १५ आॅगस्टलाच पोलिओ झाला होता. पराकोटीच्या अपंगत्वावर मात करत त्यांनी संगीत क्षेत्रात नाव मिळविले. पी. डी. देशपांडे यांच्याबरोबर १५ आॅगस्ट रोजी त्या विवाहबद्ध झाल्या. हा दिवस माझ्यासाठी नवा स्वातंत्र्यदिन असल्याचे त्या सांगायच्या.