शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र दौंडकर

By admin | Updated: January 31, 2017 23:09 IST

पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. राजेंद्र दौंडकर यांची बहुमताने निवड झाली आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 31 - पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. राजेंद्र दौंडकर यांची बहुमताने निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या तिरंगी लढतीमध्ये ३ हजार ६५५ मते घेऊन अ‍ॅड. दौंडकर यांनी विजय मिळविला. उपाध्यक्षपदी अ‍ॅड. हेमंत झंजाड आणि अ‍ॅड़ संतोष जाधव यांची निवड झाली आहे. त्यांना अनुक्रमे ३ हजार १९१आणि २ हजार १४९ मते मिळाली. सचिवपदी अ‍ॅड़ विवेक भरगुडे (२ हजार ६३७मते) आणि अ‍ॅड़ अशिष ताम्हाणे (१ हजार ६५३) विजयी झाले. खजिनदारपदी अ‍ॅड़ दत्तात्रय गायकवाड (१ हजार ३६३ मते) यांची निवड झाली़ हिशेब तपासणीस पदी अ‍ॅड़ कुमार पायगुडे (२ हजार ९७९) यांची निवड झाली़कार्यकारिणी सदस्यपदी अ‍ॅड़ ओंकार चव्हाण, अ‍ॅड़ योगिनी गायकवाड, अ‍ॅड़ ज्योती जाधव, अ‍ॅड़ श्रीकांत काळभोर, अ‍ॅड़ स्वप्नील काळे, अ‍ॅड़ अमित खोत, अ‍ॅड़ सुनील क्षीरसागर, अ‍ॅड़ संतोष मोटे, अ‍ॅड़ अनुप पाटील, अ‍ॅड़ अभिजित पोळ या १० जणांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी ५ हजार १५७ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. पोलीस निरीक्षक नितीन कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली जाधव आणि सहाय्यक पोलीस फौजदार प्रताप बिरंजे यांनी लावलेल्या चोख बंदोबस्तामुळे निवडणूक सुरळीतपणे पार पडली. सलग तिसऱ्या वर्षी बारच्या निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा वापर करण्यात आला. जिल्हा न्यायालयातील अशोका हॉल, जेन्टस बार रुम आणि नवीन इमारतीसमोरील अशा तीन निवडणूक केंद्रात २४ इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे मतदान घेण्यात आले. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड़ एकनाथ सुगावकर यांनी काम पाहिले. अ‍ॅड. प्रवीण नलावडे, अ‍ॅड. संजय दळवी, अ‍ॅड. शिरीष शिंदे यांनी सह-निवडणूक अधिकारी म्हणून, तर अ‍ॅड. अमरसिंह पाटील, अ‍ॅड. यशवंत खराडे, अ‍ॅड. ज्ञानेश्वर बर्डे, अ‍ॅड. स्मिता देशमुख आणि अ‍ॅड. माधवी परदेशी यांनी सदस्य म्हणून काम पाहिले.