शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

राजनचा तपास सीबीआयकडे

By admin | Updated: November 6, 2015 01:57 IST

गँगस्टर छोटा राजनला मुंबईत आणण्यासह त्याच्या चौकशीच्या चर्चेला राज्य सरकारने पूर्णविराम दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याच्याविरुद्धचे मुंबईसह राज्यातील सर्व गुन्हे केंद्रीय गुन्हा

- जमीर काझी,  मुंबईगँगस्टर छोटा राजनला मुंबईत आणण्यासह त्याच्या चौकशीच्या चर्चेला राज्य सरकारने पूर्णविराम दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याच्याविरुद्धचे मुंबईसह राज्यातील सर्व गुन्हे केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. शिवाय संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक करारानुसार (यूएनसीटीओसी) त्याच्याविरुद्धचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्याचे राज्याचे अप्पर मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी स्पष्ट केले आहे.छोटा राजनचा तपास सीबीआय करणार असल्याने त्याला मुंबईत आणले जाईल की नाही? त्याच्यावरील खटले मुंबईत चालतील की दिल्लीत? याबाबत राज्य सरकार काहीच सांगू शकत नाही, याबाबतचा निर्णय सर्वस्वी सीबीआयकडून घेतला जाईल. सीबीआयला तपासासाठी सर्व प्रकारचे सहाय्य करण्यासाठी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे विशेष पथक असेल, असेही बक्षी यांनी स्पष्ट केले. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे छोटा राजनला मुंबईत आणण्याची शक्यता सध्यातरी संपुष्टात आलेली आहे. दहा दिवसांपूर्वी पकडल्या गेलेल्या राजनला इंडोनेशिया सरकारने हकालपट्टीवर (डिर्पोटेशन) गुरुवारी भारााच्या हवाली केले. त्यात मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गृहसचिव बक्षी, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद, सहआयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी यांची विशेष बैठक घेतली. बैठकीत राजनवर महाराष्ट्रासह अन्य राज्य व परदेशातही अनेक गुन्हे दाखल असल्याने तो ‘यूएनसीटीओसी’अंतर्गत गुन्हेगार आहे. भारतात यासंदर्भात सीबीआय ही समन्वय तपास यंत्रणा (नोडल एजन्सी) असल्याने महाराष्ट्रातील सर्व गुन्हे व त्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास बक्षी व अहमद जावेद यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयात संयुक्त पत्रकार परिषद घेवून त्याबाबतची माहिती दिली. छोटा राजनने मुंबई पोलीस दलातील काही अधिकारी दाऊद गँगशी मिळालेले असल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला का? असे विचारले असता त्याचा इन्कार करत बक्षी म्हणाले, सरकारने संघटित गुन्हेगारीचा बिमोड करणे व कायदा व सुव्यवस्था अस्तित्त्वात आणण्याला प्राधान्य दिले आहे. त्याअनुंषगाने छोटा राजनला केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या सहकार्याने पकडण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्यासाठी राष्ट्रांनी परस्पराशी सहकार्य करण्याबाबतच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘यूएनसीटीओसी’ करारामध्ये भारताचाही सहभाग आहे.