पुणे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने यांची एकमताने निवड करण्यात आली. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. राजा माने हे सध्या शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष आहेत. २९ सप्टेंबरला पुणे विभागीय कार्यालयात ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या अध्यक्षतेखाली व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राजा माने यांचा सत्कार होणार आहे. याच कार्यक्रमात पत्रकार संघातर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
राज्य मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजा माने
By admin | Updated: September 26, 2016 03:34 IST