शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’मधील खुल्या पत्राला राज ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:41 IST

डॉक्टरांविरुद्ध सामाजिक युद्ध पेटवू नका... या डॉक्टरांना धमकावणाºया बॅनर्सविषयीच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या व सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या खुल्या पत्राची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: दखल घेतली व फोन करून याविषयी सविस्तर चर्चा केली.

- डॉ. अमोल अन्नदातेडॉक्टरांविरुद्ध सामाजिक युद्ध पेटवू नका... या डॉक्टरांना धमकावणाºया बॅनर्सविषयीच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या व सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या खुल्या पत्राची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: दखल घेतली व फोन करून याविषयी सविस्तर चर्चा केली. तसेच नंतर डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला त्यांनी चर्चेसाठी आमंत्रित केले आणि तासभर या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्याबद्दल राज ठाकरे यांचे हार्दिक आभार.या चर्चेत राज ठाकरे यांनी सांगितले की, डॉक्टरांविरुद्ध असे प्रकार घडत असतील व डॉक्टरांना त्याचा मानसिक त्रास होत असेल तर ते चुकीचे आहे. बºयाचदा स्वयंस्फूर्तीने कार्यकर्ते असे काही उपक्रम राबवत असतात, पण आपल्यापर्यंत त्याची माहिती लवकर व नीट पोहोचत नाही म्हणून आपण हे मांडले व या सूचनांचे स्वागत आहे. तसेच हे बोर्ड काढले जातील व कुठल्याही डॉक्टरला त्रास झाल्यास मला कळवावे. त्याचा सोक्षमोक्ष मी तातडीने लावेन, असेही त्यांनी सांगितले.बºयाचदा रुग्ण व त्यांचे नातेवाईक मानसिकदृष्ट्या खचलेले असतात म्हणून त्यांना डॉक्टरांनी सांभाळून घ्यावे. डॉक्टर हे देवानंतर असतात, देवाला चूक मान्य असते का? तशीच डॉक्टरला ही चूक मान्य नाही. एक वेळ उपचाराला प्रतिसाद मिळणे समजू शकतो, पण वागण्यात डॉक्टरांनी चुकू नये, अशी जनतेची अपेक्षा असते. रुग्णांच्या तक्रारी आणि त्यांना मदतीसाठी आज कुठलेही व्यासपीठ उपलब्ध नाही. डॉक्टरांनीच एकत्र येऊन असे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, असेही राज ठाकरे म्हणाले.आपण विधायक पद्धतीने रुग्णहिताच्या बाजूने लढणार असाल तर सर्व डॉक्टर आपल्या पाठीशी उभे आहेत, अशी मी राज ठाकरे यांना हमी दिली. त्यावर राज ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच या कार्यात डॉक्टरांना सोबत घेऊन डॉक्टरांच्याच पुढाकाराने रुग्णांच्या प्रश्नांसाठी एखादी हेल्पलाइन, सोशल मीडियाचे व्यासपीठ उभे करण्याविषयीही राज ठाकरे यांनी सूचना केली. तसेच वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम करण्याविषयीच्या अजून कोणत्या योजना असू शकतात याविषयीची माहितीही त्यांनी जाणून घेतली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे