ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - 'नीट’ परीक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर सुमारे २० ते २५ मिनिटे झालेल्या या बैठकीत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी 'नीट'संदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी विद्यार्थी व पालकही उपस्थित होते.
दरम्यान या बैठकीत राज ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यादरम्यान राजकीय विषयावरही चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
यापूर्वी याच परीक्षेच्या मुद्यावरून टीका करताना राज यांनी देश सरकार चालवत आहे की कोर्ट ? असा सवाल उपस्थित केला होता.