ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरेचा अपघात झाल्याने राज ठाकरेंचा ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यानचा नियोजित महाराष्ट्र दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे. उर्वशी ठाकरेची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र उद्यापासून सुरु होणा-या राज ठाकरेंच्या दौ-याविषयी मनसेने अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही.
राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे रविवारी तिच्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरुन जात होती. मात्र दुचाकी घसरल्याने उर्वशी ठाकरे आणि तिची मैत्रिण या दोघीही पडल्या. या अपघतात उर्वशीच्या पायाला व चेह-याला मार लागल्याचे समजते. सध्या उर्वशीची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.