शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प रद्द होईपर्यंत तुमच्याच पाठीशी राहीन - राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:54 IST

नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात लढा तीव्र करा. हा प्रकल्प हद्दपार होईपर्यंत लढा व सरकारला असा झटका द्या की पुन्हा कोकणवर प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याची हिंमत होणार नाही.

रत्नागिरी/राजापूर : नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात लढा तीव्र करा. हा प्रकल्प हद्दपार होईपर्यंत लढा व सरकारला असा झटका द्या की पुन्हा कोकणवर प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याची हिंमत होणार नाही. तुम्ही एकत्र राहणार असाल तर मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, असे आश्वासन महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी प्रकल्पग्रस्तांना दिले.राजापूर तालुक्यातील नाणारसह १५ गावांमध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. नाणार परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या भावना, भूमिका जाणून घेण्यासाठी राज ठाकरे यांनी शनिवारी तेथील प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मनसेची भूमिका प्रकल्पग्रस्तांसमोर मांडली.ठाकरे म्हणाले की, ज्याप्रमाणे गोवा, केरळमध्ये प्रदूषणकारी प्रकल्प नेण्याचे धाडस शासन करीत नाही, त्याप्रमाणेच कोकणातून रिफायनरी प्रकल्प हद्दपार केल्यावर असे प्रदूषणकारी प्रकल्प पुन्हा येथे आणण्याचे धाडस सरकार पुन्हा कधीच करणार नाही.आतापर्यंत अनेक लोक, नेते येथे येऊन गेले. त्यांनी आश्वासने दिली. पण इतर लोक आणि राज ठाकरे यांच्यात हाच फरक आहे.एखादी गोष्ट मी हातामध्ये घेतल्यानंतर ती शेवटपर्यंत नेल्याशिवाय मी थांबत नाही. आता मुंबईत गेलो की मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रकल्प रद्द करा, हे त्यांच्या कानी घालेन.‘विकले जाणाºयांना बुकला’ : प्रकल्प जर रद्द करायचा असेल तर सर्वांना एकजूट राखावी लागेल. हे मान्य आहे का, असे ठाकरे यांनी विचारले असता ‘होय’ असा जोरदार प्रतिसाद उपस्थितांनी दिला. आजपर्यंत जे प्रकल्प आले त्यांना प्रथम तीव्र विरोध झाला. नंतर पैशांची पॅकेज दिली गेली. लोक घरंगळत गेले. यापुढे जर असे प्रकल्प नको असतील तर एकजूट राखा. विकल्या जाणाºया लोकांवर लक्ष ठेवा. त्यांना बुकलले पाहिजे, हे लक्षात ठेवा. नेतृत्व करणारे विकले गेले तर तुम्हाला ब्रह्मदेवही वाचवू शकणार नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे