शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

राज ठाकरे उतरणार निवडणूक आखाडय़ात

By admin | Updated: June 1, 2014 01:29 IST

‘आगामी विधानसभा निवडणुकीत स्वत: उभा राहणार आणि महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिल्यास राज्याचे नेतृत्वही करणार’,

मुंबईत घोषणा : ‘अब की बार, राज सरकार’
 
मुंबई : ‘आगामी विधानसभा निवडणुकीत स्वत: उभा राहणार आणि महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिल्यास राज्याचे नेतृत्वही करणार’, अशा स्पष्ट शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी निवडणूक आखाडय़ातील प्रवेशाची घोषणा केली. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली चार दशके सक्रिय असलेल्या ठाकरे कुटुंबीयांपैकी स्वत: मतदारांना सामोरे जाणारे राज हे पहिलेच नेते असतील़ 
लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी सोमय्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. प्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी न होण्याची ‘ठाकरी’ परंपरा राज यांनी आज बाजूला सारली. राज यांनी स्वत: विधानसभा लढवण्याची घोषणा करताच उपस्थित मनसैनिकांनी एकच जल्लोष केला.
भाषणाच्या सुरुवातीलाच राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. ‘या निवडणुकीत जनतेने केवळ मोदींचे ऐकले. मोदींच्या नावावरच भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांचे उमेदवार निवडून आले. मोदींचा चेहरा नसता तर इतकी मते पडली असती का, असा सवालही राज यांनी या वेळी केला.  
पराभवानंतर मनसे संपल्याचा दावा करणा:यांवरही राज यांनी यावेळी शरसंधान साधले. ते म्हणाले की, मनसे संपली म्हणणा:यांनी सभेला जमलेली गर्दी पाहावी. लहानपणापासून पराभव पाहत आलोय आणि त्यातून कसे पुढे  यायचे याचे बाळकडूही घेतले आहेत. या पराभवातून उसळी मारत वर येईन आणि विधानसभेत मुसंडी मारुन दाखवेन, अशी गर्जनाही त्यांनी यावेळी केली. 
मनसेला कायम प्रश्न विचारले जातात. नाशिकमध्ये काय केलं, याचा जाब विचारला जातो. नाशिकची सत्ता येऊन अवघी 2 वर्षे झाली. मात्र, 3क्-3क् वर्षे महापालिकेत सत्तेवर असणा:यांना का प्रश्न विचारत नाही. नाशिकची सत्ता आली तेंव्हा महापालिकेवर 65क् कोटींचे कर्ज होते. त्यातूनही नाशिकचा विकास करतोय. मोठय़ा प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत आणि येत्या काही वर्षात नाशिकचा बदल लोकांना दिसेल, असा विश्वास राज यांनी यावेळी व्यक्त केला़ मात्र, सुरु असलेली कामे जनतेर्पयत पोहचविण्यात अपयशी ठरल्याबद्दल नाशिकच्या पदाधिका:यांना त्यांनी फटकारले. 
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करण्याचा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यावेळी काँग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केले असले तरी राहुल गांधी यांनी महात्मा गांधींचा सल्ला मनावर घेतला आहे. काँग्रेस बरखास्त करुन दाखविणारच, असा चंग राहुल गांधीनी बांधल्याचे सांगत राज यांनी खिल्ली उडविली.  (प्रतिनिधी)
 
उत्तरोत्तर गर्दी वाढत गेली 
राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी सायंकाळी पाचनंतर गर्दी वाढत गेली. कार्यकत्र्यानी भरलेल्या वाहनांचे ताफे मैदानालगत दाखल होऊ लागले. सभेकडे जाणारा पूर्व द्रुतगती मार्गाचा सव्र्हीस रोड कार्यकत्र्यासह वाहनांनी वाहू लागला. मैदानात प्रवेश करण्यासाठी तीन मुख्य प्रवेशद्वारे उभारण्यात आली होती. या तिन्हीही प्रवेशद्वारांवर कार्यकत्र्याच्या रांगा होत्या आणि सूर्यास्तार्पयत सभेचे मैदान हाऊसफूल झाले.
 
वाहनतळ भरले : चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानाजवळचे वाहनतळ हाऊसफूल झाले होते. चुनाभट्टी रेल्वेलाईन लगतच्या मैदानावर कार्यकत्र्यानी खच्चून भरून आलेली वाहने उभी करण्यात आली होती. शिवाय पूर्व द्रुतगती मार्गालगतच्या सव्र्हीस रोडवरही कार्यकत्र्याच्या वाहनांची भली मोठी रांग लागली होती. 
 
अब की बार राज सरकार..
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदाच शनिवारी सायन येथील सोमय्या मैदानावर सभा घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आले होते. पक्षाचे ङोंडे हाती घेतलेले कार्यकर्ते मनसेचा विजय असो..अब की बार राज सरकार.. अशा घोषणा देत होते.
 
हायवेवरील वाहतूक सुरळीत
राज ठाकरे यांची सभा सायंकाळी असल्याने पूर्व द्रुतगती महार्गावरुन घरी परतणा:या चाकरमान्यांचे वाहतूक कोंडीमुळे हाल होण्याची शक्यता होती. मात्र, वाहतूक पोलिसांनी सोमय्या मैदानाजवळील पूर्व द्रुतगती महार्गावरील वाहतूक व्यवस्थेचे चोख नियोजन केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु होती. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणा:या प्रवाशांना त्रस झाला नाही.
 
30 शेंग विक्रेत्यांचा सभांवर डोळा
मनसेच्या कार्यकत्र्याच्या दिमतीला सुमारे 30 शेंग विक्रेते पनवेलहून हजर झाले होते. शेंग विक्रेत्यांकडून 10 रुपयांना शेंग विक्री करण्यात येत होती. सभेच्या ठिकाणी शेंग विक्री चांगली होत होती. हे शेंग विक्रेते मुंबई, ठाणो जिल्ह्यात सभा असणा:या ठिकाणी दुचाकी गाडय़ांवरुन जातात. आंध्र प्रदेशातील शेंग विक्रेते दिवसाला जेवणाचा खर्च काढून 300 रुपयांची कमाई करतात.
 
कार्यकत्र्याची भोजन व्यवस्था
राज्यभरातून सभेसाठी मुंबईत दाखल होणा:या कार्यकत्र्याच्या जेवणाची व्यवस्था मनसेने केली होती. दादर, शिवडी, वडाळा, कुर्ला आदी ठिकाणच्या महापालिका शाळांमध्ये कार्यकत्र्याच्या भोजनाची व्यवस्था केली होती. कार्यकत्र्यासाठी भवानी कॅटर्सकडून 35 हजार कार्यकत्र्याच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
 
आकर्षक नंबर प्लेट्स
राज्यभरातून येथे दाखल होणारी मनसे पदाधिका-यांची वाहने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. विशेषत: त्या वाहनांवरील नंबरप्लेट्स आणि त्यावरील क्रमांक इंटरेस्टिंग होते. अशाच एका वाहनांचा 4727 हा क्रमांक मराठी अक्षराप्रमाणो वळविण्यात आला होता. त्यामुळे तो प्रथमदर्शनी  ‘मनसे’ असा दिसत असल्याने अनेकांचे या वाहनांकडे लक्ष जात होते. शिवाय एक अंकी क्रमांक असलेली वाहने उदा. 5 किंवा 1क्क् अशा क्रमांकाच्या आणि आलिशान गाडया उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या.
चोख सुरक्षा व्यवस्था
सभेच्या मैदानावर चोख सुरक्षा व्यवस्था होती. वाहनतळ, पूर्व द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजू, सव्र्हीस रोड, तिन्ही मुख्य प्रवेशद्वार, मैदानातील प्रवेशद्वार, व्यासपीठ आणि मैदानालगतची मोकळी जागा; अशा सर्वच ठिकाणी महिला आणि पुरुष पोलिसांचा पहारा होता. शिवाय महिला पोलिसांची संख्या यात मोठी होती. महत्त्वाचे म्हणजे येथे दाखल होणा:या कार्यकत्र्याना मार्गाची दिशा दाखविण्यात वाहतूक पोलीसही महत्वाची भूमिका बजावत होते.
 
महिलांची संख्या अधिक..
राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी महिला कार्यकत्र्या मोठया संख्येने दाखल झाल्या होत्या. सायंकाळी सहानंतर येथे दाखल होणा:या महिला कार्यकत्र्याची गर्दी उत्तरोत्तर वाढत होती. यामध्ये गृहिणींसह तरुणींचा समावेशदेखील होता.  शिवाय मैदानामध्ये महिलांसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था करण्यात आली होती. आणि ती हाऊसफूल झाली होती.
 
टाचा उंचावतात तेव्हा..
राज ठाकरे सभास्थानी दाखल झाले आणि व्यासपीठासह समोर बसविण्यात आलेल्या स्क्रीनवरील दृश्य पाहण्यासाठी उपस्थितांच्या टाचा उंचावू लागल्या. राज यांच्या आगमनानंतर  कार्यकत्र्याकडून जोरजोरात घोषणांचा पाऊस पडू लागला. शिवाय टाळ्यांचा वर्षाव होऊ लागला. राज दाखल होताच वाजविण्यात आलेल्या संगीताने तर येथील कार्यकत्र्यामध्ये आणखी जान आली. 
 
मनसे स्टाईल म्हणजे सलूनमधील हेअर स्टाईल नव्हे. कोणीही उठत आणि मनसे स्टाईलची धमकी देतो. खळ्ळ खटय़ाक्हे जनतेच्या भल्यासाठी आहे. व्यक्तिगत कामासाठी खळ्ळ खटय़ाक खपवून घेणार नाही, असा दमही राज यांनी भरला.