शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

राज ठाकरेंना आवरला नाही सवतसड्याचा मोह!

By admin | Updated: June 24, 2015 00:42 IST

चिपळूण तालुका : पाण्याची खळखळ अन् ओंसडणारा धबधबा...

सुभाष कदम - चिपळूण --तब्बल १५ दिवस उशिरा पाऊस सुरु झाला आणि आता तो गेल्या आठवडाभर बऱ्यापैकी स्थिरावला आहे. त्यामुळे पर्यटकांचे खास आकर्षण असलेला मुंबई-गोवा महामार्गावरील सवतसडा धबधबा फेसाळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र धारांनी पर्यटकांना साद घालत आहे. या धबधब्याचा मोह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आवरला नाही. त्यांनी सोमवारी येथे भेट देऊन छायाचित्रे काढली.गेल्या आठवडाभर चिपळूण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. आतापर्यंत ९४८.२२ मिमी पाऊस पडला आहे. नद्या, नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. डोंगराळ भागातून अनेक लहान मोठे झरे धबधब्याच्या रुपाने उसळी मारुन वर आले आहेत. त्यांचे निथळ स्वच्छ, पांढरे शुभ्र पाणी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या पर्यटकांचे खास आकर्षण ठरते. कशेडी घाट सोडला तर चिपळूणपर्यंत पर्यटकांना मोठा धबधबा पहावयास मिळत नाही. त्यामुळे चिपळूणचा सवतसडा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण असते. हिरवाईत दाट धुक्याबरोबर बदलणाऱ्या वातावरणाने रिमझिम पावसात चिंब भिजण्याचा आनंद आता पर्यटकांना घेता येणार आहे. कड्यावरुन वेगाने कोसळणारा धबधबा आता ओसंडून वाहत आहे. त्याचा प्रचंड आवाज, पाण्याची खळखळ आणि त्यावर मस्ती करणारे पर्यटक हा एक अवर्णनीय क्षण असतो. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या धबधब्यावर येऊन बराचवेळ थांबले होते. शिवाय या धबधब्याची छायाचित्रेही कॅमेराबद्ध केली. त्यांच्यासोबत कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर, चिपळूण तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, प्रशांत परब आदी पदाधिकारी होते. आता पावसाळी हंगाम सुरु झाल्याने सवतसडा धबधबा ओसंडून वाहत आहे. तो पाहण्यासाठी महामार्गावरील असंख्य पर्यटक येथे थांबतात. उत्साही पर्यटकांची येथे रेलचेल असते. महाविद्यालयीन विद्यार्थीही मोठ्या संख्येने येथे येतात. या ठिकाणची माहिती देणारा फलक सह्याद्री विकास समितीतर्फे लावण्यात आला आहे. वनखात्याच्या सहकार्याने लावलेल्या या फलकावर आवश्यक त्या सूचना लिहिल्या आहेत. तथापि, वीक एण्डच्या मस्तीत असलेल्या अनेक पर्यटकांचे या फलकाकडे दुर्लक्ष होते. महामार्गापासून धबधब्याकडे जाण्यासाठी आकर्षक जांभ्याची पाखाडी आहे. त्यामुळे हा प्रवास सुखाचा होतो. अनेक प्रेमीयुगुल येथे असणाऱ्या झाडाझुडपांचा आधार घेवून मौजमस्ती करीत असतात. सवतसडा जेथे कोसळतो तेथे जाणे अत्यंत अवघड आहे. येथे जाणे अनेकवेळा जीवघेणे ठरु शकते. त्यामुळे पाण्याजवळ मस्ती करणे, पाण्याचा जेथे ओढा आहे, तेथे उभे राहून फोटोसेशन करणे महागात पडू शकते. आपली हौस भागविताना पुरेशी काळजी घ्यायला हवी, अशा सूचना करायलाही राज ठाकरे विसरले नाहीत.