शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याचे आदेश

By admin | Updated: April 27, 2016 06:17 IST

मुंबईकरांना शांतपणे सर्व सहन करण्याची सवय लागली आहे.

मुंबई : मुंबईकरांना शांतपणे सर्व सहन करण्याची सवय लागली आहे. वाहतूककोंडी, खड्डे याकडे मुंबईकर दुर्लक्ष करतात, असा टोला लगावत उच्च न्यायालयाने पावसाळ्यापूर्वी मुंबईचे रस्ते दुरुस्त आणि खड्डेमुक्त करण्याची सूचनाही पालिकेला केली. तसेच रस्ते दुरुस्तीचा आणि खड्डे बुजवल्याचा प्रगती अहवाल ८ जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकेवरील सुनावणीदरम्यान मध्यस्थींनी पालिकेने नागरिकांसाठी खड्ड्यांसंदर्भात तक्रार करण्यासाठी उपलब्ध केलेले संकेतस्थळ बंद असल्याची तक्रार उच्च न्यायालयाकडे केली. ‘संकेतस्थळाबरोबरच महापालिकेने नागरिकांना तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबरही उपलब्ध केला होता. मात्र हा टोल फ्री नंबरही बंद आहे,’ अशी माहिती या याचिकेतील मध्यस्थीच्या वकिलांनी दिली. पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी टोल फ्री नंबर सुरू आहे तर संकेतस्थळाऐवजी ३० मार्चपासून फेसबुक अकाउंटवर तक्रार नोंदवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली ‘वेगवगेळ्या यंत्रणा रस्ते खोदतात, मात्र ते पूर्वीच्या स्थितीत ठेवत नाहीत. जगात तंत्रज्ञान एवढे प्रगत आहे की, एका रात्रीत खड्डे बुजवता येऊ शकतात. मात्र ते येथे वापरले जात नाही,’ असे म्हणत खंडपीठाने खड्डे आणि रस्ता दुरुस्तीचे काम कधी पूर्ण करण्यात येणार, अशी विचारणा महापालिकेकडे केली. त्यावर अ‍ॅड. साखरे यांनी मोठ्या रस्त्यांचे काम ३० मेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन खंडपीठाला दिले. (प्रतिनिधी)>पत्राचे याचिकेत रूपांतरमुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अनेक जीव जात आहेत, अशा आशयाचे पत्र उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश गौतम पटेल यांनी मुख्य न्यायाधीशांना लिहिले. त्यांच्या पत्राची दखल घेत उच्च न्यायालयाने त्यांच्या पत्राचे रूपांतर जनहित याचिकेत करून ही याचिका स्वत:च दाखल करून घेतली.