शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

...वळीवाचा पाऊस जोर धरणार

By admin | Updated: May 11, 2017 03:00 IST

राजस्थान तसेच उत्तरेकडून आलेल्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे एप्रिलमध्ये बाष्पयुक्त ढगांची निर्मिती न झाल्याने यंदा पूर्वमोसमी

विवेक भुसे । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राजस्थान तसेच उत्तरेकडून आलेल्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे एप्रिलमध्ये बाष्पयुक्त ढगांची निर्मिती न झाल्याने यंदा पूर्वमोसमी पावसामध्ये मोठी घट झाली आहे़ संपूर्ण राज्यात आतापर्यंत सोलापूर वगळता बाकी सर्व ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस कमी किंवा जवळपास झालेला नाही़ परंतु, आता मेमध्ये सर्वदूर चांगला वळीवाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.देशभरात एक मार्च ते एप्रिलअखेरपर्यंत साधारण ६५ मिमी पावसाची नोंद होते़ यंदा ६२ मिमी पाऊस झाला असून, जवळपास ४ टक्के पाऊस कमी नोंदविला गेला आहे़ देशभरातील २६ हवामान विभागापैकी केवळ २ विभागात जादा पाऊस झाला आहे. १२ विभागात सर्वसाधारण पाऊस झाला आहे़ १० विभागात २० ते ५९ टक्के कमी पाऊस झाला असून १२ विभागात ६० ते ९९ टक्के कमी पाऊस झाला आहे़ महाराष्ट्रातील चारही विभागात पूर्वमोसमी पाऊस कमी झाला आहे़ याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, आपल्याकडे एप्रिलमध्ये उत्तर व राजस्थानाच्या वाळवंटातून उष्ण व कोरडे वारे जास्त प्रमाणात आले़ त्यात अजिबात आर्द्रता नव्हती़ त्यामुळे ढगांची निर्मिती झाली नाही़ पश्चिम बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला नाही़ त्यामुळे समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्येही बाष्पाचे प्रमाण कमी होते़ त्यामुळे तापमानातही मोठी वाढ झाली आहे़ मेच्या पहिल्या आठवड्यात त्यात बदल झाला असून समुद्रावर जास्त दाब निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी ढगांची निर्मिती होत आहे़ उंच वाढीचे ढग निर्माण होऊ लागले आहेत़ पाच किमीपेक्षा उंच लांबीचे ढग निर्माण होऊ लागल्याने गारा पडायला लागल्या आहेत़ जो अनुभव आपल्याला दरवेळी एप्रिलमध्ये येतो, तो आता येत आहे़ मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यतायेत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़ १२ मेला राज्यात संपूर्ण भागात तुरळक ठिकाणी पाऊस होणार असून, १३ व १४ मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़ कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे़ मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे़प्रमुख शहरांमधील तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ३९़६, जळगाव ४२़२, कोल्हापूर ३७़१, महाबळेश्वर ३४़२, मालेगाव ४४, नाशिक ३९़१, सांगली ३९़४, सातारा ३९़५, सोलापूर ४०़५, मुंबई ३४़८, अलिबाग ३५़९, रत्नागिरी ३३़५, पणजी ३४़३, डहाणू ३५, उस्मानाबाद ३८़२, औरंगाबाद ४१, परभणी ४१़६, नांदेड ४१़५, बीड ४२, अकोला ४४़१, अमरावती ४१़८, बुलढाणा ४०़६, चंद्रपूर ४२़८, गोंदिया ४०़८, नागपूर ४२, वर्धा ४२़५, यवतमाळ ४१़५