अहमदनगर : शनिवारी जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून, शहरातील सीना नदीला सायंकाळी पूर आला़ नेवासा शहराला पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. पुराच्या पाण्यामुळे शेकडो घरांमध्ये पाणी घुसून हजारो लोक बेघर झाले. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. नगर व नेवासा शहरात प्रशासनाकडून रात्री उशिराने मदतकार्य सुरू करण्यात आले़ रविवारी पहाटेपर्यंत मदतकार्य सुरू होते़ रविवारीही पावसाचा जोर कायम होता़ गेल्या दोन दिवसांत शहर आणि ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे अनेक नद्या, ओढे आणि नाले पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत होते. काही ठिकाणी पिके वाहून गेल्याच्याही घटना घडल्या. पुरामुळे अनेक ठिकाणी जनावरेही दगावली. (प्रतिनिधी)
नगरमध्ये पावसाचा धुमाकूळ
By admin | Updated: September 1, 2014 01:55 IST