शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

बांधकाम परवान्यांसाठी लातुरात अर्जांचा पाऊस

By admin | Updated: October 22, 2016 23:19 IST

दुष्काळामुळे तब्बल तीन वर्षांपासून घरबांधणीचे स्वप्न अपुरे राहिलेल्या लातूरकरांनी यंदा पावसाने कृपादृष्टी केल्याने बांधकाम परवान्यांसाठी अर्जांचा पाऊस पाडला आहे.

लातूर : दुष्काळामुळे तब्बल तीन वर्षांपासून घरबांधणीचे स्वप्न अपुरे राहिलेल्या लातूरकरांनी यंदा पावसाने कृपादृष्टी केल्याने बांधकाम परवान्यांसाठी अर्जांचा पाऊस पाडला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शहरात बांधकामाच्या परवान्यांना स्थगिती होती़ यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे महापालिकेने बांधकाम परवान्यांना मंजुरी देण्यास सुरुवात केली. १ सप्टेंबर ते २२ आॅक्टोबर या दीड महिन्याच्या कालावधीत बांधकामासाठी ५०७ अर्ज आले असून, त्यापैकी ४३० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे़दुष्काळामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्प कोरडेठाक पडले होते़ नागरिकांना पाण्याची गरज भागविण्यासाठी खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम परवान्यांना बंदी केली होती़ परिणामी, तीन वर्षांपासून बांधकामे रखडली होती़ यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा १२ मिमी़ अधिक पाऊस झाला. त्यामुळे सर्व मोठे, मध्यम व लघु प्रकल्प तुडूंब भरले. शहरातील पुनर्भरण केलेले बोअरही भरले आहेत. पाच नंबर चौक ते शासकीय दवाखान्यापर्यंतच्या समांतर रस्त्यावर बांधकामे सुरू झाली आहेत़ सुशिलादेवी नगर, रिंग रोड, आदर्श कॉलनी, विवेकानंद चौक, रेणापूर नाका भागातील बांधकामांना गती आली आहे़ (प्रतिनिधी)परवान्याचेही नियम शिथिलपाणीटंचाईमुळे तीन वर्षांपासून बांधकामांसाठी किचकट नियम होते़ पावसामुळे आता सरसकट परवाने देण्याचे प्रक्रिया सुरू केली आहे़ मालकी हक्काचा उतारा, अर्ज व जागेचा नकाशा या तीनच कागदपत्रासह लागणाऱ्या कामगार उपकराला प्राधान्य देण्यात आले आहे. - सुनील देशपांडे, नगर रचनाकार, महापालिका