शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती चिंताजनक

By admin | Updated: July 11, 2017 22:08 IST

राज्यातील १२ जिल्ह्यात पावसाने दगा दिल्याने चिंंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून त्यात विदर्भ, खानदेशातील ९ तर, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 11 - राज्यातील १२ जिल्ह्यात पावसाने दगा दिल्याने चिंंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून त्यात विदर्भ, खानदेशातील ९ तर, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील परभणी या जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २६ ते ४२ टक्के कमी पाऊस झाला आहे़ याशिवाय १३ जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून केवळ १० जिल्ह्यात सरासरीऐवढा अगर त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 

राज्यात १ जून ते ११ जुलै दरम्यान काही मोजके दिवस सोडल्यास पावसाने दडी मारली आहे़ विशेषत: विदर्भाला त्याचा अधिक फटका बसला आहे़ मराठवाड्यात जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने तेथील परिस्थिती काही प्रमाणात चांगली आहे़ पण, गेल्या १० दिवसांपासून तेथेही पाऊस जवळपास झालेला नाही़

विदर्भ व खानदेशातील धुळे -२८, जळगाव -२६, अमरावती -४२, नागपूर -३१, भंडारा -३५, गोंदिया -३८, अकोला -२६, चंद्रपूर -३७, गडचिरोली -२९, तर मराठवाड्यातील परभणी -२७, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली -३६ आणि कोल्हापूर -२७ टक्के कमी पाऊस झाला आहे.

राज्यातील १३ जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ कोकणात पाऊस होत असला तरी जेवढा पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याचे दिसून येत आहे़ सिंधुदुर्ग -१५, रत्नागिरी -७, सातारा -१६, औरंगाबाद -१६, जालना -४, नांदेड -१२, यवतमाळ -१९, वर्धा -१, बुलढाणा -५, मुंबई -२९, वाशिम -१०, हिंगोली -७ आणि नंदूरबार -९ टक्के पाऊस कमी झाला आहे़ राज्यात सर्वाधिक पाऊस सोलापूर येथे सरासरीपेक्षा ७४ टक्के अधिक झाला असून नगर ३०, नाशिक ३०, पालघर ३९, ठाणे २५, पुणे २६, उस्मानाबाद ४६, रायगड ५, लातूर ९, बीड ३ टक्के जादा पाऊस झाला आहे़ राज्यात मॉन्सून सक्रीय होण्यास आणखी तीन दिवस लागणार असून तो आणखी लांबल्यास शेतीच्या दृष्टीने ही परिस्थिती प्रतिकुल ठरु शकते़ सध्या उत्तर प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तर भारतात जोरदार पाऊस पडत आहे़ मॉन्सूनच्या एकूण पावसापैकी जुलैमध्ये ३५ टक्के आणि आॅगस्टमध्ये ३५ टक्के पाऊस पडत असतो़ राज्याच्या दृष्टीने गेला आठवड्यात पावसाने ताण दिला आहे़ शेतीच्या दृष्टीने तो प्रतिकुल ठरला आहे़ सरासरी पाऊस पडला तरी त्याचे वितरण महत्वाचे असते़ त्यामुळे राज्यात विशेषत: विदर्भात सध्या प्रतिकुल परिस्थिती आहे़ आणखी तीन दिवसांनंतर राज्यात पाऊस सक्रीय होण्याची शक्यता आहे़डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी, हवामानतज्ञ