शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

राज्यभरात पाऊस मुक्कामी

By admin | Updated: September 15, 2015 01:59 IST

पश्चिम मध्य व लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम राहिल्याने राज्यात पाऊस पडण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नैॠत्य मोसमी पावसाचा

पुणे : पश्चिम मध्य व लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम राहिल्याने राज्यात पाऊस पडण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नैॠत्य मोसमी पावसाचा परतीच्या प्रवासाने अद्यापही राजस्थान, पंजाब, हरियाणाच्या काही भागात मुक्काम ठोकलेला आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत राज्यात ठिकठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ठिकठिकाणी पाऊस पडला.गेल्या २४ तासांत कोकणात जव्हार येथे ४० मिमी, कणकवली, महाड, मालवण, मुंबई (कुलाबा), मुंबई (साांताक्रूझ), मुरबाड, पालघर, पोलादपूर, पाली, ठाणे २ ० मिमी, चिपळूण, खेड, माणगाव, म्हापसा, रोहा, संगमेश्वर-देवरुख, येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे तर मध्य महाराष्ट्र येवला येथे ४० मिमी, मंगळवेढा, पारनेर, शहादा येथे प्रत्येकी ३० मिमी, बारामती, भोर, धडगाव / गिधाडे, गगनबावडा, महाबळेश्वर, नांदरुबार, ओझरखेडा, फलटण, पुरंदर-सासवड, सोलापूर येथे प्रत्येकी २० मिमी, दहिवडी, दौंड, एरंडोल, हरसूल, खटाव-वडूज, कोरेगाव, माळशिरस, शिरूर, सुरगणा, वेल्हे येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.मराठवाड्यात ननलांगा ३० मिमी, घनसावंगी, हादगाव, कळमनुरी, कंधार येथे प्रत्येकी २० मिमी, देगलूर, गंगाखेड, लोहारा, मुखेड, नांदेड, पालम, परांडा, सोयेगाव येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडला आहे. विदर्भात गोंडपिपरी येथे ५० मिमी, पांढरकवडा, उमरखेड येथे प्रत्येकी ४० मिमी, दिग्रस, काटोल, कोपरणा, मानोरा, वणी, झरीझामनी येथे प्रत्येकी ३० मिमी, दारव्हा, जोईती, महागाव, मारेगाव, समुद्रपूर, यवतमाळ येथे प्रत्येकी २० मिमी, अमरावती, आष्टी, भद्रावती, धामणगाव, हिंगणघाट, मोर्शी, पोम्भूर्णा, सेल ू वर्धा, वरोरा येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. भिरा येथे ९० मिमी, डुगांरवाडी येथे ६० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पुढील ४८ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.