शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाऊस ओसरला, पण वाहतूक कोंडी वाढली

By admin | Updated: August 2, 2016 03:51 IST

पावसाने रविवारी जोरदार हजेरी लावून सोमवारी थोडी उसंत घेतली असली तरी शहराच्या विविध रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

ठाणे : पावसाने रविवारी जोरदार हजेरी लावून सोमवारी थोडी उसंत घेतली असली तरी शहराच्या विविध रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे शहराच्या विविध भागांत सोमवारी कामाच्या पहिल्याच दिवशी वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र दिसून आले. कापूरबावडीवरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावर खड्ड्यांची संख्या वाढल्याने येथे रात्रीपासूनच वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे सोमवारी सकाळीदेखील जवळपास एक किमीपर्यंत वाहने उभी होती. केवळ पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी वाहनांना पाऊण ते एक तासाचा कालावधी गेल्याने पहिल्याच दिवशी कामावर अनेकांचा लेटमार्क लागला.रविवारी पाऊस जमके बरसल्याने शहराच्या विविध भागांत पाणी साचले होते. सोमवारी पावसाचा जोर ओसरला आणि शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी वाहनांचा वेग मात्र चांगलाच मंदावला. शहराच्या अनेक भागांत खड्डेच खड्डे दिसून आले. विशेष म्हणजे कापूरबावडीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ब्रिजवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने येथील वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे दिसून आले. चारपदरी घोडबंदरच्या एका लेनसह सर्व्हिस रोडवरही वाहनांच्या रांगा होत्या. परंतु, सर्व्हिस रोडवर असलेल्या खड्ड्यांमुळेदेखील वाहनचालक हैराण झाले होते. त्यामुळे मानपाडा ते कापूरबावडी असे केवळ पाच मिनिटांहून अधिकचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना पाऊण तासाहून अधिकच वेळ लागत होता. >जेटपॅचरचा फंडाही अपयशीपालिका वारंवार येथे खड्डे बुजवत आहे. परंतु, येथे जेटपॅचरचा फंडाही अपयशी ठरल्याचे दिसत आहे. दुसरीकडे स्टेशन ते जांभळीनाका या अंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. परंतु, या रस्त्यावरदेखील आता खड्डे पडले आहेत. सॅटीसवरही खड्डे पडल्याने बसचा मार्गही काहीसा खडतर झाला आहे.