पुणे : मान्सून राज्यात पुन्हा परतण्याची चिन्हे तूर्तास तरी दिसत नाहीत. गेल्या २४ तासांत राज्यात तुरळक ठिकाणीच पाऊस पडला. कोकण आणि विदर्भात सुरू असलेला पाऊसही गायब झाला. पुढील दोन दिवस राज्यात कोठेही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. गेल्या आठवड्यात कोकण आणि विदर्भात अनुकूल स्थितीमुळे पाऊस पडत होता. मात्र, मंगळवारपासून त्याचे प्रमाणही वेगाने घटले. गेल्या २४ तासांत गोंदिया येथे सर्वाधिक ६० मिलिमीटर पाऊस पडला. पुढील २४ तासांत कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
राज्यातून पाऊस गायबच !
By admin | Updated: September 3, 2015 01:03 IST