मुंबई : मागील आठवड्याभरापासून अधून-मधून कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगराला अक्षरश: झोडपून काढले. सकाळी सुरू झालेल्या जलधारांनी सायंकाळपर्यंत कायम ठेवलेल्या माऱ्यामुळे धावत्या मुंबईला किंचितसा ब्रेक लागला आणि दिवसभर पडलेल्या पावसाची शहरात ४६.७०, पूर्व उपनगरात ३५.४५ आणि पश्चिम उपनगरात ३०.९४ मिलीमीटर नोंद झाली. या नोंदीनुसार उपनगराच्या तुलनेत शहरात पावसाचा जोर अधिक असल्याचे चित्र होते.मंगळवारी सकाळी शहरात कुलाबा, फोर्ट, भायखळा, लालबाग, परळ, दादर, माटुंगा, महालक्ष्मी, वरळी आणि प्रभादेवी या भागात पावसाचा अधिक जोर होता. पूर्व उपनगरांत वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला, घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड तर पश्चिम उपनगरांत सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी, बोरीवली व गोरेगाव या भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने दुपारी ३ नंतर मात्र काहीशी विश्रांती घेतली आणि शहरासह उपनगरातील पावसाचा जोर ओसरला. मात्र, जोरदार सरींमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, सांताक्रुझ-सीएसटी रोड, वांद्रे-कुर्ला संकुल, लालबहादूर शास्त्री मार्ग, अंधेरी कुर्ला रोडसह पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता.शहर आणि उपनगरात सरींचा जोरदार मारा सुरू असतानाच असल्फा गाव येथील जंगलेश्वर मंदिरालगतच्या दरडीचा भाग कोसळल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. संबंधित ठिकाणी महापालिकेकडून आवश्यक मदतकार्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. पूर्व उपनगरात २, पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण ५ ठिकाणी पाणी तुंबले. येथील पाण्याचा निचरा करण्यासाठीचे आदेश प्रशासनाकडून संबधित विभागाला देण्यात आले. शहरात १, पश्चिम उपनगरात १ अशा एकूण २ ठिकाणी घरांच्या भाग पडल्याच्या घटना घडल्या. शहरात १ ठिकाणी शॉर्टसर्किटची घटना घडली. शहरात ४, पूर्व उपनगरात १, पश्चिम उपनगरात १० अशा एकूण १५ ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने या घटनांत जीवितहानी झालेली नाही. (प्रतिनिधी)>२०, २१ जुलैला मुंबईत मुसळधार पश्चिम समुद्र किनाऱ्यावर दक्षिण महाराष्ट्र ते केरळच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे.मागील चोवीस तासांत कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली.२० ते २३ जुलै या काळात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस पडेल.२० ते २१ जुलै या काळात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील.>कुठे पडला किती पाऊसभायखळा५४.१कुलाबा५८.६६धारावी२६.९वरळी३८.३४अंधेरी५०.२८बीकेसी२९.७बोरीवली३९.८७दहिसर२५.१२दिंडोशी५०.३१गोरेगाव४०.६४कांदिवली२७.४४मालाड३४.७९भांडुप१३.२२चेंबूर३३.४८कुर्ला४६.२२मुलुंड४४.२पवई१८.५५विक्रोळी१३.१६
पावसाने मुंबईकरांना झोडपले
By admin | Updated: July 20, 2016 05:57 IST