शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

राज्यात पुन्हा धुवॉंधार पाऊस! जाणून घ्या मुंबईसह राज्यातील परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 16:04 IST

मुंबई, दि. 19 - मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात ...

ठळक मुद्दे वरळी, लालबाग, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, ठाणे, डोंबिवली भागात जोरदार पाऊस सुरु आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे.

मुंबई, दि. 19 - मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. खरं तर सकाळपासून पावसाचं वातावरण नव्हतं. मात्र दुपारी 2 च्या सुमारास अंधारून आल्यावर येऊन पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील दादर, वरळी, लालबाग, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, ठाणे, डोंबिवली भागात जोरदार पाऊस झाला. तसंच कांदिवली, बोरीवलीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. तसंच विलेपार्ले, सांताक्रुझ, अंधेरी, गोवंडी, चेंबूर आणि मानखुर्द परिसरात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. साकीनाका भागातही पावसाने हजेरी लावली असून पवई, कांजूरमार्ग भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू आहे. 

सिंधुदुर्गात पावसाचा कहरसिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव-आंबेरी पुलावर मंगळवारी सकाळपासून पावसाचं पाणी आल्यानं माणगाव खोर्‍यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. शाळेतील विद्यार्थी व  शिक्षक यांनाही या पाण्यामुळे खोळंबून राहावं लागलं आहे. मंगळवारी  माणगावचा आठवड्याचा बाजार असल्यामुळे तुफान पावसाचा अनेकांना फटका बसला आहे.

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू आहे. पावसामुळे नदीकाठावर असणा-या गावातील लोकांची पळापळ झाली आहे. कुडाळ-आंबेडकर नगरमध्ये पुराचे पाणी शिरले असून काळसे बागवाडी पाण्याखाली गेली आहे. मालवण तालुक्यातील बागायत, मसुरे-कावा भागात पूरजन्य परिस्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक अंतर्गत मार्ग ठप्प झाले आहेत. 

रत्नागिरी व रायगडला अतिवृष्टीचा इशारा

दरम्यान, कोकणातील कुडाळ, मालवण, कणकवली, रत्नागिरी, लांजा येथे अतिवृष्टी झाली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. येत्या २४ तासात कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याला सलग दुस-या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. कुडाळ, मालवण आणि कणकवली तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. कोकण किनारपट्टीवर ताशी ४५ ते ५० किमीच्या वेगाने वारे वाहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना त्यांना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

पुणे शहरात पावसाचा जोर वाढला, अनेक रस्त्यांवर साचले पाणी पुणे शहर व परिसरात काल रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून उपनगरांमध्ये जोरदार वर्षाव होत आहे. त्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. खडकवासला, धनकवडी, कात्रज, सिंहगड रोड परिसरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. शहरातही सकाळी अकरा नंतर पावसाची संततधार सुरु आहे. 

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुणे वेधशाळेत ९ मिमी पावसाची नोंद झाली होती. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून सिग्नल बंद पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. 

पावसाचा जोर वाढल्याने काही धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. उजनी धरणातून १० हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून खडकवासला, घोडनदी धरणातून नदीत पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. खडकवासला, सिंहगड, पानशेत, खडकवासला, वरसगाव, टेमघर परिसरात आज सकाळपासून धुवांधार पाऊस सुरू असून ओढे, नाले, नद्या खळखळून वाहत आहेत. 

राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु झाल्यामुळे राधानगरी धरणाचे सात  स्वयंचलीत दरवाजे उघडण्यात आले आहेत. 12 हजार 196 क्यूसेक प्रति सेकंद  पाणी भोगावती पात्रात पडत असल्याने संध्याकाळ पर्यंत कोल्हापुर पद्धतीचे  बंधारे पाण्याखाली जाऊन अनेक मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीकाठावरील ग्रामस्थाना प्रशासनाचा सावधानतेचा इशारा  देण्यात आला आहे.