शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

रेल्वे प्रकल्पांना मिळाले आर्थिक बळ

By admin | Updated: February 4, 2017 02:03 IST

मुंबई उपनगरीय मार्गावरील रेल्वे प्रकल्पांना अर्थसंकल्पात आर्थिक बळ देण्यात आले आहे. त्यामुळे सुरू असलेल्या प्रकल्पांना गती मिळू शकते.

मुंबई : मुंबई उपनगरीय मार्गावरील रेल्वे प्रकल्पांना अर्थसंकल्पात आर्थिक बळ देण्यात आले आहे. त्यामुळे सुरू असलेल्या प्रकल्पांना गती मिळू शकते. यामध्ये एमयूटीपी-३ आणि एमयूटीपी-२ मधील प्रकल्पांबरोबरच सीवूड-उरण आणि कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठीही भरीव निधी आहे. एमयूटीपी-३ ला नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये पनवेल-कर्जत उपनगरीय दुहेरी मार्ग, वसई-विरार चौपदरीकरण, कळवा-ऐरोली उन्नत जोडमार्ग, नवीन गाड्या, रूळ ओलांडतानाचे अपघात रोखणे याचा समावेश आहे. या योजनेसाठी ४११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी दिली. एमयूटीपी-२ मधील प्रकल्पांसाठीही १३७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे रखडलेल्या दिवा-ठाणे पाचवा व सहावा मार्ग, सीएसटी-कुर्ला पाचवा-सहावा मार्ग आणि अंधेरीचा गोरेगावपर्यंत विस्तार हे प्रकल्प पुढे सरकण्यास मदत मिळेल. राज्य सरकारकडूनही एमयूटीपी-२ आणि एमयूटीपी-३ साठी तेवढाच निधी उपलब्ध होईल. गेल्याच वर्षी काम सुरू केलेल्या कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेचेही काम जलद गतीने पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात ७0 कोटी रुपयांचा निधी प्रकल्पासाठी देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन हस्तांतरणासह अन्य कामे करण्यावर भर दिला जाऊ शकतो, अशी आशा रेल्वेचे अधिकारी व्यक्त करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उरण हे मुंबईशी जोडण्याचे नियोजन असून त्यासाठी सीवूड-उरण हा मार्ग बांधला जात आहे. प्रकल्प यंदाच्या वर्षात डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्याच्या कामासाठी ६६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)प्रवासी सुविधांसाठी ८३ कोटी रुपयेप्रवासी सुविधांसाठी ८३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये सरकते जिने, लिफ्ट त्याचबरोबर रेल्वे इमारतींची दुरुस्ती, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती आणि प्लॅटफॉर्मवरील अन्य सुविधांचा समावेश आहे. राज्यातील जुन्या प्रकल्पांसाठीही निधीअमरावती-नरखेड, अहमनगर-बीड परळी वैजनाथ, बारामती-लोणंद. पुणतांबा-शिर्डी, वर्धा-नांदेड, कराड-चिपळूण, दिघी फोर्ट-रोहा, इंदौर-मनमाड व्हाया मालेगाव, पुणे-नाशिक आणि वैभववाडी-कोल्हापूर या जुन्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. प्लॅटफॉर्मची उंची वाढणार मध्य रेल्वेवरील ३३ स्टेशनवरील ४८ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नेरळ-माथेरान रेल्वेमार्ग हा धोकादायक झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षा कामांसाठीही १ कोटी ५0 लाखांचा निधी, तसेच पश्चिम रेल्वेवरील एटीव्हीएमसाठी ३ कोटी ७0 लाख, चर्नी रोड ते ग्रँट रोड दरम्यान रोड ओव्हर ब्रिजसाठी ३ कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे.