शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

पान टपरीवर रेल्वे ई-तिकीट

By admin | Updated: July 21, 2016 05:28 IST

रेल्वे ई-तिकिटांची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून नुकतेच देण्यात आले.

मुंबई : रेल्वे ई-तिकिटांची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून नुकतेच देण्यात आले. त्या आदेशानुसार मुंबईत रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) कारवाई केली जात आहे. ई-तिकिटांची विक्री पानाची टपरी, ट्रॅव्हल्स शॉप आणि मोबाईल शॉपमधून सर्रासपणे होत असल्याचे समोर आले आहे. पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने मुंबईतील काही ठिकाणी मंगळवारी छापे टाकत तब्बल ११ लाख ७३ हजार २३४ रुपयांची ३२५ ई-तिकिटे वेगवेगळ्या ठिकाणांहून हस्तगत केली. रेल्वे पोलिसांची एकाच दिवसांतील ही सर्वात मोठी कारवाई आहे. दहा दिवसांपूर्वी कांदिवली पश्चिम डॉ. दळवी रोड येथील राम टी-हाउसमधून रेल्वेच्या ई-तिकिटांची अनधिकृतरीत्या तिकीट विक्री होत असल्याची माहिती पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार, धाड टाकत ४ हजार १२३ रुपयांचे एक ई-तिकीट जप्त केले आणि पुढील चौकशीनंतर आरोपीच्या सहकाऱ्यांची माहिती घेत आणखी २१ ई-तिकिटे जप्त केली होती. रेल्वे सुरक्षा दलाकडून ही कारवाई अद्यापही सुरूच असून, रेल्वेमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आदेशच दिले आहेत. त्यानुसार, धडक मोहीम मुंबईतील अनेक ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाने हाती घेतली आहे. मंगळवारी (१९ जुलै) जोगेश्वरी पश्चिम अनंत नगर येथील मलिक ट्रॅव्हल्स शॉप नंबर दोनवर धाड टाकत ६५ हजार ५४४ रुपये किमतीची २८ ई-तिकिटे हस्तगत केली. ही तिकिटे विकताना १५0 ते ३00 रुपये एवढ्या जादा किमतीने विकण्यात येणार होती, अशी माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली. त्यानंतर जोगेश्वरी पश्चिम बेहराम बाग येथील यश मोबाइल अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स येथे धाड टाकत १८ हजार ३0३ रुपये किमतीची १४ तिकिटे हस्तगत केली. ही तिकिटेही १00 ते २00 रुपये जादा दराने विकण्यात येणार होती. त्यानंतर कांदिवली पश्चिम चारकोप ओमकार सोसायटीत असलेल्या एका फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात ई-तिकिटांची विक्री होणार असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यात टाकलेल्या धाडीत १0 लाख ८९ हजार ३८७ रुपये किमतीची तब्बल २८३ ई-तिकिटे हस्तगत केल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)>पर्सनल आयडीवरून केली विक्रीई-तिकिटांची विक्री ही पर्सनल आयडीवरून करण्यात येत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. या धाडीत काही वापरून झालेली तिकिटेही हस्तगत करण्यात आली आहेत. यात ४७ हजार ९३ रुपये किमतीच्या २१ आणि ३३ हजार ६४९ रुपये किमतीच्या २४ तिकिटांचाही समावेश आहे. ई-तिकिटांच्या अनधिकृत विक्रीला आळा बसवण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. यात अनेक ठिकाणांहून ई-तिकिटे जप्त केली जात आहेत. ही मोहीम यापुढेही सुरुच राहिल.- आनंद झा (पश्चिम रेल्वे सुरक्षा दल-वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त)