शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमुळेच देशाचा विकास शक्य!

By admin | Updated: May 23, 2017 03:29 IST

रेल्वेमुळेच देशाचा विकास शक्य आहे, असे सांगत ‘रेल बढे, देश बढे’ असा उद्घोष रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुुंबई : रेल्वेमुळेच देशाचा विकास शक्य आहे, असे सांगत ‘रेल बढे, देश बढे’ असा उद्घोष रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केला. सोमवारी दादर येथे मध्य आणि हार्बर रेल्वेवरील स्थानकांतील प्रवासी सेवांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी देशातील सर्वात जलद ‘तेजस’ एक्स्प्रेसला (मुंबई-करमळी) त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.देशातील ४० हजारांपेक्षा जास्त रेल्वे डब्यांत सुरक्षिततेच्या दृष्टीने काही त्रुटी आहेत. तीन वर्षांत ही सगळी कामे उरकणे शक्य झाले नाही. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण असे ४० हजार नवे डबे सेवेत आणणार आहे. प्रवासी सुरक्षिततेसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे आहे. शंभराहून अधिक स्थानकांतील वाय-फाय सुविधा दोन वर्षांत ४०० स्थानकांमध्ये देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांगासाठी १५० शौचालये बांधण्यात येणार आहेत, अशी माहितीही प्रभू यांनी दिली.नेत्यांची मंदियाळी : कार्यक्रमाला खासदार अरविंद सांवत, गोपाळ शेट्टी, राहुल शेवाळे, हुसैन दलवाई, किरीट सौमय्या, डॉ. श्रीकांत शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते. त्याचबरोबर, ‘मरे’चे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, ‘परे’चे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता, आरसीएफ महाव्यवस्थापक आर.पी.नि. बरिया, एमआरव्हीसीचे सीएमडी प्रभात सहाय, आयआरसीटीसीचे सीएमडी ए. के. मनोचा उपस्थित होते.३५ मिनिटांचा लेटमार्क‘तेजस’ एक्स्प्रेसला पहिल्याच दिवशी ३५ मिनिटांचा लेटमार्क लागला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या विमानाला विलंब झाल्यामुळे त्यांना दादर येथे पोहोचण्यास उशीर झाला. मात्र, कार्यक्रमस्थळी पोहोचताच रेल्वेमंत्र्यांनी उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत, ‘तेजस’ला हिरवा झेंडा दाखवला.‘महाराज’ म्हणा : कर्नाटक येथील ‘जय महाराष्ट्र’ वादाचा दाखला देत, खासदार अरविंद सावंत यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मराठी शिका आणि मराठीतच बोला, असा सज्जड दम दिला. त्याचबरोबर, सूत्रसंचालन करणाऱ्याला छत्रपती शिवाजी ‘महाराज’ टर्मिनस असा उल्लेख करा, अशी आठवण केली. या वेळी रेल्वेने डबलडेकर ट्रेनबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, ‘तेजस’ला कणकवली येथे थांबा देण्याची मागणी सावंत यांनी या वेळी केली.