शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे ट्रॅक अर्थसाह्य विषय फेटाळला

By admin | Updated: August 22, 2016 00:43 IST

दोन रेल्वे लेनसाठी महापालिकेने २७५ कोटी रुपये द्यावेत, हा रेल्वे मंत्रालयाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत फेटाळण्यात आला.

पिंपरी : पुणे-लोणावळादरम्यान आणखी दोन रेल्वे लेनसाठी महापालिकेने २७५ कोटी रुपये द्यावेत, हा रेल्वे मंत्रालयाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत फेटाळण्यात आला. रेल्वे मंत्रालय आणि राज्य शासन यांच्या वतीने पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी आणि चौथी उपनगरीय रेल्वे लेन सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी जमीन संपादनाव्यतिरिक्त २३०६ कोटी रुपये इतका खर्च येणार असून त्यामध्ये महाराष्ट्र शासन व रेल्वे मंत्रालयाचा समान हिस्सा असेल, असे ठरले आहे. राज्य शासनातर्फे द्यायची पन्नास टक्के रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाततर्फे दिली जाते, त्याचप्रमाणे रेल्वे लाइन प्रकल्पासाठीची ५० टक्के रक्कम पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे देण्याबाबत शासनाने आदेश दिले. महापालिका आणि प्राधिकरण यांनी आपापल्या हद्दीतील लांबीप्रमाणे देय असलेली ५० टक्के रक्कम देण्याबाबत कळविले.या रेल्वे ट्रॅकसाठी येणाऱ्या एकूण २३०६ कोटी रुपये खर्चापैकी महापालिका हद्दीत होणाऱ्या रेल्वे ट्रॅकचा खर्च सुमारे ५५० कोटी रुपये आहे. रेल्वे ट्रॅकसाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम देण्यासाठी पालिका तयार असल्याचे रेल्वे विकास कॉपोर्रेशनला कळविले होते.(प्रतिनिधी)>चर्चा नाहीचपालिका हद्दीतील रेल्वे ट्रॅकसाठी येणाऱ्या राज्य शासनाच्या एकूण ५५० कोटी रुपये खर्चातील ५० टक्के अर्थात २७५ कोटी रुपये रक्कम पालिका राज्य शासनाला देय आहे. हा विषय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतीही चर्चा न करता फेटाळला.