शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील रेल्वे प्रकल्पांची ‘लोकसभे’शी सांगड, रेल्वेमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 05:37 IST

मुंबईकरांसाठी सध्या मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) सुरु असलेले सर्व प्रकल्प ‘फास्ट ट्रॅक’ वर आणण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिले आहेत. बुधवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत महामंडळाच्या

मुंबई : मुंबईकरांसाठी सध्या मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) सुरु असलेले सर्व प्रकल्प ‘फास्ट ट्रॅक’ वर आणण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिले आहेत. बुधवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांना हे आदेश दिले. सद्यस्थितीतील प्रकल्प ‘फास्ट ट्रॅक’वर आणावे, २०१९ च्या लोकसभा निवडणूकांपूर्वी हे काम पूर्ण करावे, असे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी एमआरव्हीसीतर्फे महत्त्वांकाक्षी प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. त्यात मध्य रेल्वेवर ठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्ग आणि लोकल फेºया वाढवण्यासाठी सीबीटीसी प्रकल्प, सीएसएमटी-पनवेल फास्ट कॉरिडोर यांचा समावेश आहे. यापैकी संबंधित प्रकल्पांवर सुरु असलेली विकासकामांचा आढावा घेऊन त्याचा अहवाल त्वरीत सादर करण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिले आहेत. मध्य मार्गावरील प्रवाशांच्या सोईसाठी ठाणे-दिवा मार्गावरील पाचवा-सहावा मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. हा मार्ग डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होता. मात्र जमीन हस्तांतरणाच्या वादामुळे या मार्गासाठी मार्च २०१९ ही डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी या मार्गावरील जमीन हस्तांतरणाचा वाद पूर्णपणे मिटला आहे. परिणामी सध्या तरी हे काम पूर्ण करण्यात कोणत्याही अडचणी नाही. कामांचा वेग कायम राहिल्यास मार्च २०१९ पर्यंत या मार्गावर लोकल धावण्यास सुरुवात होईल, अशी माहिती एमआरव्हीसीच्या सूत्रांनी दिली. तर परळ टर्मिनसचे कामही मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.सीबीटीसी प्रकल्प प्रकल्पांमुळे हार्बर मार्गावरील लोकल फेºयांच्या संख्येत ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होणार आहे. सध्या रेल्वे बोर्डाकडे सीबीटीसी सिग्नल यंत्रणेचा प्रकल्प मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. अंतिम मंजुरीनंतर तीन वर्षांच्या आत ही यंत्रणा हार्बर मार्गावर बसवण्यात येईल. पुढील दोन वर्षांत ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करेल. तसेच भविष्यात २० वातानुकूलित लोकल देखील सुरू करण्यात येणार आहे. सीएसएमटी-पनवेल फास्ट कॉरिडोरसाठी आशियाई डेव्हल्पमेंट बँक निधी उपलब्ध करुन देणार आहे.जमीन हस्तांतरणाचा वादठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्गात जमीन हस्तांतरणाचा मोठा वाद होता. हा वाद दोन महिन्यांपूर्वी पूर्णत: मिटलेला आहे. या प्रकल्पासाठी मार्च २०१९ ही डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. हा मार्ग सुरु झाल्यास प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. या मार्गामुळे लोकल फेºयांची संख्या देखील वाढवण्यास देखील मदत होईल. एलिव्हेटेड प्रकल्प आणि मेट्रो प्रकल्प यांचा आढावा घेऊन सर्वसमावेश अहवाल तयार करण्यात येणार आहे. या अहवालानंतर प्रवाशांच्या सोईनुसार वाहतूक यंत्रणेचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले. 

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वे