शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘रायगडा’वर दुरवस्था, पुरातत्त्व विभागाने जबाबदारी झटकली; शिवप्रेमींकडून नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 08:52 IST

त्याचदिवशी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संबंधित विभागाची बैठक घेऊन याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

जमीर काझी  अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरील दुरवस्था दूर करण्याबाबतचे राज्याचे पर्यटनमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले निर्देश ५० दिवसांपासून कागदावरच राहिले आहेत. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने गडावरील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असल्याचे कळवून आपली जबाबदारी झटकली आहे. 

रायगड किल्ल्यावरील दुरवस्था, महाराजांच्या कथित श्वानाच्या चौथाऱ्याच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षकांकडून ऐतिहासिक ओवरीचा वापर चौकीसारखा करणे, कपडे वाळविणे, स्वच्छतागृह उभारल्याबाबतचे वृत्त १८ ऑक्टोबरला ‘ लोकमत’ने ‘शिवरायांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यात पुरातत्त्वची बेफिकिरी’ या शीर्षकाअंतर्गत दिले होते. त्याचदिवशी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संबंधित विभागाची बैठक घेऊन याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

त्यानंतर २१ ऑक्टोबरला रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय दंडाधिकारी, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, उपविभाग महाडचे संरक्षण सहायक यांना  चौकशी करून नियमोचित कार्यवाही केल्याबद्दलचा ७ दिवसांमध्ये वस्तुनिष्ठ अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र डिसेंबरचा पहिला आठवडा उलटूनही किल्ल्यावरील परिस्थिती तशीच आहे. या अनास्थेबद्दल शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी दोन दिवसापांसून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाही. त्यांचे ओएसडी प्रवीण बोंडे यांनी हा विषय सांस्कृतिक विभागाच्या अखत्यारित असून पर्यटनमंत्री केवळ निर्देश देऊ शकतात, याबाबत जिल्हा प्रशासनाने काय कार्यवाही केली आहे माहीत नाही, ती मिळाल्यानंतर कळवितो, असे सांगितले.

रायगड किल्ल्यातील दुरवस्थेबाबत प्रशासनाबरोबर पोलिस विभागाकडूनही अहवाल मागविला होता. त्यांनी काय कार्यवाही केली त्याबाबत माहिती मागवून घेतो. -  डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रायगड

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या गडातील दुरवस्थेबाबत केंद्रीय पुरातत्त्व विभाग व प्रशासनाची उदासीनता दुर्दैवी आणि शिवप्रेमींत संताप निर्माण करणारी आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तातडीने आदेश देण्याची आवश्यकता आहे. - इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक

टॅग्स :Raigadरायगड