नवी दिल्ली : करचोरीच्या संशयावरून प्राप्तिकर विभागाने ‘इंडिया बुल्स’च्या दिल्ली व मुंबईतील कार्यालयांवर छापे टाकले. याविषयी माहिती देताना प्राप्तिकर विभागातील अधिकारी म्हणाले, की ‘इंडिया बुल्स’विरोधात कारवाई करण्यायोग्य पुरावे मिळाल्याने त्यांच्या विविध कार्यालयांची तपासणी करण्यात आली. ‘शेअर, बाँड अशा प्रकारच्या जंगम मालमत्तांचे हस्तांतरण प्रकरणांची चौकशी प्राप्तिकर विभागाकडून करण्यात येत आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयातून काही कागदपत्रे व संगणक जप्त केले आहेत. ‘इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड’ने या प्रकरणी मुंबई शेअरबाजार कार्यालयाला देखील माहिती दिलेली आहे. तसेच या प्रकरणी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले. अधिकाऱ्यांना कंपनीच्या व्यवहारामध्ये काही आक्षेपार्ह आढळणार नाही, असा विश्वासदेखील ‘इंडिया बुल्स’ कंपनीच्या वतीने व्यक्त करण्यात आला. (प्रतिनिधी)
‘इंडिया बुल्स’च्या कार्यालयावर छापे
By admin | Updated: July 14, 2016 04:09 IST